मोहोळ मतदार संघात राजू खरे यांची वाढती लोकप्रियता
मतदार संघातील तीन तालुक्यात विविध विकासकामांच्या निधीसाठी पाठपुरावा

संपादक-दिनेश खंडेलवाल
मोहोळ मतदार संघात राजू खरे यांची वाढती लोकप्रियता
मतदार संघातील तीन तालुक्यात विविध विकासकामांच्या निधीसाठी पाठपुरावा
पंढरपूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहे. मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघातूनही इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू आहे. अशातच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार युवा उद्योजक राजू खरे यांनी यंदाची निवडणूक लढवायची आणि जिंकायचीच यासाठी प्रयत्न सुरू ठेवले असून खरे यांच्या नावासाठी लोकप्रियता वाढल्याचे चित्र मतदारसंघांत पाहावयास मिळू लागले आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये आत्तापासूनच इच्छुक उमेदवार स्वखर्चातून विकास कामे करताना दिसत आहे तर याचबरोबर मतदार संघातील गावभेट दौराही सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मोहोळ विधानसभा मतदार संघात तीन तालुक्यातील मतदारांचा समावेश आहे. यामध्ये मोहोळ तालुक्याचा सर्व भाग, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यातील काही भाग आहे. यामुळे राजू खरे यांनी तीनही तालुक्यातून आपला गवभेट दौरा वाढवीत, विविध समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
राजू खरे यांनी आपल्या गावभेट दौऱ्यात अनेक गावात आर्थिक मदत करीत मूलभूत प्रश्न मार्गी लावले आहेत. शासनाच्या वतीनेही कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मोहोळ मतदार संघातील नागरिकांकडून आतापासूनच राजू खरे यांच्या उमेदवारीला मतदारांतून वाढती पसंती मिळताना दिसत आहे.
राजू खरे हे मूळचे कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जात आहेत. त्यात ते उद्योजक असल्याने या मतदार संघातील शिवसैनिकांतून खरे यांच्याबाबतीत आपल्याला खंबीर नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे मोहोळ मतदार संघातील शिवसैनिकानी राजू खरे यांच्या उमेदवारीसाठी मागील अनेक दिवसापासून पसंती दर्शविली आहे. यामुळे गावोगावी राजू खरे यांची लोकप्रियता जनमानसात वाढत असल्याचे दिसत आहे.
मोहोळ मतदार संघातील तीनही तालुक्यासाठी विविध विकास कामाचा निधी आणण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू असून लवकरच हा निधी मिळणार असल्याची खात्री इच्छूक उमेदवार राजू खरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.