मयत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना भावी आमदार राजू खरे यांचेकडून दोन लाखांची मदत
मोहोळ तालुक्यातील चार कुटुंबाला मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला शिवसेनेकडून मोठा आधार

संपादक-दिनेश खंडेलवाल
मयत शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना भावी आमदार राजू खरे यांचेकडून दोन लाखांची मदत
मोहोळ तालुक्यातील चार कुटुंबाला मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला शिवसेनेकडून मोठा आधार
पंढरपूर : मोहळ मतदारसंघांमध्ये अनेक ठिकाणी आपल्या स्वखर्चातून रस्ते, पाणी आदी प्रश्न सोडवून तळागाळातील जनतेशी नाळ जोडलेले आणि सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे भावी आमदार तथा संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांचे रूपाने जनतेची जाण असणारा नेता लाभला आहे. त्यांनी विविध प्रश्नांबरोबरच आता मतदारसंघातील मृत्यू पावलेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबालाही आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
मोहोळ तालुक्यातील चार गावातील शिवसैनिक व पदाधिकारी यांचे निधन झाले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे भावी आमदार तथा संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांना ही माहिती मिळताच त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्यासोबत जाऊन मयत कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख आणि मुलींच्या शिक्षणाचा शाळेचा खर्च उचलला आहे. यामुळे मोहोळ भागातील शिवसैनिकांना आता भावी आमदार राजूभाऊ खरे यांचा मोठा आधार वाटू लागला आहे.
मोहोळ तालुक्यातील दिकसळ येथील कै.तात्यासाहेब धावणे पाटील यांच्या कुटुंबातील मुलगा शिवम यांच्याकडे रोख रक्कम सुपूर्द केली आहे. नरखेड येथील कै.महादेव चौधरी यांच्या पत्नी तर याच गावातील कै. ऋषिकेश राऊत यांच्या कुटुंबातील आईकडे ५० हजाराची रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली आहे.
वाळूज येथील स्व. वैजिनाथ मोटे यांच्या घरी जाऊन पत्नी आणि आईकडे रोख रक्कम सुपूर्द करण्यात आली. यावेळी मुलीच्या शिक्षणासाठी सर्व खर्च स्वतः देण्याचीही घोषणा भावी आमदार राजू खरे यांनी बोलताना व्यक्त
केली. यामुळे वरील सर्व कुटुंबीयांना मदतीचा मोठा आधार मिळाला आहे.
मयत कुटुंबातील आधार लाभलेल्या महिलांनी मात्र भावी आमदार राजू खरे यांनी मोहोळ तालुक्याचे आमदार होऊन आम्हाला साथ द्यावी त्याचबरोबर या मतदार संघाचा खरा विकास आपल्या हातूनच होणार आहे. आपल्याला गोरगरिबांची जाण आहे. आपणच आमचे खरे आधारस्तंभ आहे. अशी साद घातली.
या मदतीवेळी सेनेचे उप जिल्हाप्रमुख दादासो पवार, माजी सरपंच प्रकाश पारवे, माजी जी. प. सदस्य दादासो कर्णवळ, समाधान खंदारे, अमर सोनवले ज्ञानेश्वर पाटील, सचिन सुरवसे, किरण वाघमोडे, विलास ढेरे , हरिभाऊ खंदारे, संजय मस्के, सोनू शिंदे यांचेसह मोहोळ तालुका आणि शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट— भावी आमदार राजू खरे यांच्या रूपाने शिवसैनिकांना भेटला मोठा आधार——
मोहोळ परिसरात शिवसेना मोठ्या प्रमाणात आहे. मात्र त्यांना आधार देणारे भक्कम असे नेतृत्व मिळत नव्हते. यामुळे अनेक जण विस्कटलेले दिसून येत होते. परंतु भावी आमदार राजू खरे यांच्या रूपाने सक्षम नेतृत्व लाभत आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी गट तट न पाहता आम्ही सर्वजण शिवसेनेसाठी त्यांच्या पाठीशी राहू असा विश्वास नरखेड भागातील जेष्ठ शिवसैनिक हरिभाऊ खंदारे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.