ईतर

नव्या पिढीने जागरूक राहणे गरजेचे आहे- नंदकुमार देशपांडे

विद्यार्थी जीवनातच विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायद्याची दिली माहिती

संपादक-दिनेश खंडेलवाल

नव्या पिढीने जागरूक राहणे गरजेचे आहे- नंदकुमार देशपांडे

विद्यार्थी जीवनातच विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायद्याची दिली माहिती

पंढरपूर : देशभर साजरा केला जाणारा दिवस तो म्हणजे ग्राहकदिन 24 डिसेंबर 1986 चा ग्राहक संरक्षण कायदा आज आपण आपल्याला या कायद्यान्वये प्राप्त झालेल्या दिवसाचा ग्राहक दिन म्हणून साजरा करत आहोत. आपण सर्वजण ग्राहक आहोत कोणतीही वस्तू खरेदी करताना आपण प्रथम पावतीचा आग्रह धरला पाहिजे ही वस्तू बद्दल तिची योग्यता तिचे मूल्य याबाबत चौकसपणे पाहणी करून खरेदी करावी कारण आपण वस्तू खरेदी करताना फसलो जाणार नाहीत याची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांनी केले.

पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन या संस्थेमध्ये आठवी नववी दहावी या विद्यार्थी विद्यार्थिनी सोबत ग्राहक संरक्षण जनजागृती व ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी बोलत होते. प्रथम अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे दैवत व प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन कर्मयोगी प्रशालेच्या प्राचार्य प्रियदर्शनी सरदेसाई यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. तर दीप प्रज्वल तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये जिल्हा सदस्य आण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर,तालुकाध्यक्ष नंदकुमार देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्राहक पंचायतीच्या वतीने प्राचार्य सरदेसाई मॅडम यांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना श्री देशपांडे म्हणाले की आजचे विद्यार्थ्यी हे उद्याचे भावी नागरिक आहेत. याकरता ग्राहक संरक्षण कायदा आपल्याला फार मोलाचा आहे. आपल्याला सुरक्षितेची माहिती मिळवण्याचा, वस्तू निवडण्याचा, तक्रार निवारण्याचा व ग्राहक शिक्षणाचा आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क आहे. ग्राहकांनी डोळे सजत ठेवून व्यवहार करावे. नव्याने नऊ ऑगस्ट 2019 चा कायदा पारित झाला असून ऑनलाईन खरेदीची फसवणूक याचाही यामध्ये समावेश करण्यात आला असून यामध्ये नवीन 107 कलमाचा समावेश आहे.

आपण वस्तू खरेदी करताना पावती घेणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. प्रारंभी प्रास्ताविक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये यांनी ऑनलाइन फसवणूक 2019 चा कायदा याची थोडक्यात माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपली चौकस बुद्धी जागृत ठेवून वस्तू खरेदी करताना आपण आपल्या हक्काचा उपयोग करावा. आपल्याला माहिती मिळवण्याचा हक्क आहे. वस्तू निवडण्याचा हक्क आहे. याचा आपण जरूर वापर करावा आज आपल्याला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी येऊन ग्राहक संरक्षण कायद्याविषयी मोलाची माहिती दिली आहे. आपण या कायद्याचा जरूर वापर करावा असे प्राचार्य प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम यांनी सांगितले.

शेवटी अण्णा ऐतवाडकर यांनी आभार मानले तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्राचार्य सरदेसाई मॅडम यांनी केला कार्यक्रमाची सांगता विद्यार्थी यांनी वंदे मातरम गाऊन केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close