सामाजिक

शास्त्रीय संगीतात पारंगत असलेले गायक छोटे उस्ताद सुपरस्टार फेम राजयोग धुरी यांच्या गीतांचा पंढरीत कार्यक्रम

नववर्षानिमित्त पंढरपूरकरांसाठी स्वरतरंग या बहारदार गीतांची मेजवानी

संपादक – दिनेश खंडेलवाल 

शास्त्रीय संगीतात पारंगत असलेले गायक छोटे उस्ताद सुपरस्टार फेम राजयोग धुरी यांच्या गीतांचा पंढरीत कार्यक्रम

नववर्षानिमित्त पंढरपूरकरांसाठी स्वरतरंग या बहारदार गीतांची मेजवानी

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूरातील नागरिकांसाठी स्वरसुधा संस्थे मार्फत नवीन वर्षात शास्त्रीय संगीताचा विनामूल्य बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नववर्षाचे औचित्य साधून स्वरसुधा पंढरपूर यांचे वतीने ‘छोटे उस्ताद मी होणार सुपरस्टार फेम’ गायक राजयोग धुरी यांचा बहारदार गीतांची मेजवानी शनिवार दि.3 जोनवारी 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता आरती प्रांगण, भक्ती मार्ग, पंढरपूर येथे विनामूल्य आयोजीत केला आहे. त्याचा लाभ सर्व पंढरपूरकरातील शास्त्रीय संगीत रसिकांनी घ्यावा असे आवाहन उमेश परिचारक यांनी केले आहे.

गायक राजयोग धुरी सुपरस्टार छोटे उस्ताद या रिॲलिटी शो मधील विजेता असून मोस्ट वोटेड पॉप्युलर सिंगर ऑफ महाराष्ट्र असा किताब त्याला यापुर्वी प्राप्त झाला आहे. सध्या त्याचे शास्त्रीय नाट्य संगीताचे अनेक रिल प्रसिध्द असून श्रोते त्यांचे गाण्याला पसंती देत आहेत.

सदर कार्यक्रम हा माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे उपस्थित होणार असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वरसुधा संस्थेचे ज्ञानेश्वर दुधाणे, डॉ.प्रसाद कुलकर्णी हे परिश्रम घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close