ईतर

पारंपारिक निकाली कुस्त्यासाठी संजय बाबा ननवरे यांचे सहकार्य

निकाली क्रमांक दोनच्या कुस्तीसाठी संजय बाबा ननवरे यांचे ४१ हजाराचे बक्षीस

संपादक-दिनेश खंडेलवाल

पारंपारिक निकाली कुस्त्यासाठी संजय बाबा ननवरे यांचे सहकार्य

निकाली क्रमांक दोनच्या कुस्तीसाठी संजय बाबा ननवरे यांचे ४१ हजाराचे बक्षीस

लक्ष्मणदास महाराज व्यायामशाळेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त निकाली कुस्त्यांच्या जंगी स्पर्धा

पंढरपूर : भारतीय क्रीडा क्षेत्रातील पारंपारिक समजला जाणारा कुस्ती हा खेळ सध्या सर्वत्र खेळताना पाहायला मिळतो पैलवानांसाठी खुराक आणि व्यायाम महत्त्वाचा असतो. परंतु त्याचा खर्च परवडत नसल्याने पारंपारिक कुस्ती कडे नवतरुण वळत नाही मात्र तरुणांनी कुस्तीकडे वळण्यासाठी तसेच या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी संजय बाबा ननवरे यांनी समाजकार्याबरोबरच आता क्रीडा क्षेत्राला ही सहकार्य करण्याचे ठरवल्याचे दिसून येते. कुस्ती या खेळाच्या निकाली कुस्ती क्रमांक दोन चे बक्षीस ४१ हजार रुपये रोख देऊन त्यांनी आपली सेवा बजावली आहे.

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील लक्ष्मणदास महाराज व्यायाम शाळेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर येथील अंबाबाई पटांगण येथे निकाली कुस्त्यांचे जंगी आयोजन करण्यात आले होते. या निकाली कुस्त्यांमध्ये क्रमांक दोन ची कुस्ती सदाशिवनगर येथील पैलवान प्रकाश कोळेकर कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा पठ्ठा विरुद्ध लक्ष्मणदास आखाडा वाखरी येथील पैलवान श्रीनाथ गोरे हा पैलवान समाधान अभंगराव यांचा पठ्ठा यांच्यामध्ये निकाली कुस्ती लावण्यात आली होती. या क्रमांक दोनच्या कुस्तीसाठी समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी ४१ हजार रुपये बक्षीस ठेवले होते. या निकाली कुस्तीमध्ये लक्ष्मणदास आखाडाचा पैलवान श्रीनाथ गोरे यांनी विजय मिळवत कुस्ती जिंकली. यावेळी संजय बाबा ननवरे यांनी कुस्तीचे लावलेले बक्षीस विजयी उमेदवार पैलवानास दिले.

 

आज पर्यंत समाज कार्यात व तळागाळातील अडचणीत सापडलेल्या बांधवांना मदत करणारे समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी पारंपारिक कुस्तीसाठी रोख बक्षीस ठेवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

[आधुनिक युगात तरुणांनी
संगणकाच्या ज्ञानाबरोबरच व्यायाम करून पैलवान क्षेत्रामधुन आपले करिअर करावे. कुस्ती हा आपला पारंपारिक खेळ असून या खेळामधून अनेक मल्ल तयार झालेले आजपर्यंत आपण पाहतोय. परंतु सध्याच्या तरुण पिढीने पारंपारिक कुस्ती खेळामधून नावलौकिक मिळवावे. यापूर्वी क्रिकेट खेळासाठी आपण बक्षीस देत होतो आता पारंपारिक कुस्ती खेळासाठी ही बक्षिस देताना मनोमन आनंद होत आहे. अशी प्रतिक्रिया समाजसेवक संजय बाबांना ननवरे यांनी व्यक्त केली.]

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close