सामाजिक

भाळवणी येथे DVP दि पिपल्स मल्टीस्टेट शाखेचे उदघाटन मा.आमदार दिपक आबा सांळुखे यांच्या हस्ते…..

पारदर्शक कारभारामुळे उच्चांक स्थान मिळवेल:- चेअरमन अभिजीत पाटील

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : अल्पावधीतच सोलापूर जिल्ह्यामध्ये डिव्हीपी ग्रुपच्या दि. पीपल्स मल्टीस्टेट शाखेच्या माध्यमातून मोठे जाळे निर्माण होत आहे याचा सर्वसामान्य जनतेला लाभ होणार आहे. अडचणीच्या काळात मदतीचा हात म्हणून दि. पीपल्स मल्टीस्टेट चा लाभ होईल अशी प्रतिक्रिया माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.

प्रारंभी भाळवणी येथे DVP दि. पिपल्स मल्टीस्टेट या नवीन शाखेचे उदघाटन सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे-पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना दि. पिपल्स मल्टीस्टेट शाखेचे संस्थापक अभिजीत आबा पाटील म्हणाले की उत्कृष्ट व पारदर्शक कारभारामुळे जनमानसात मल्टीस्टेटने विश्वासाचं नातं निर्माण केले आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर भाळवणी येथे देखील मल्टीस्टेट उच्चांक स्तरावर जाईल असा विश्वास यावेळी अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.

मा.संचालक इस्माईल गुरुजी मुलाणी, मा.संचालक हरिभाऊ शिंदे, जयराम शिंदे, व्हाईस चेअरमन शरद अडगळे, भाळवणीचे सरपंच विठ्ठल चौगुले, उपसरपंच दीपक गवळी, ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील, पत्रकार नितीन शिंदे,सद्दाम सय्यद, हभप तात्या महाराज भाळवणीकर, सलीम काझी,शिवाजी बाबर,
धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक अभिजीत कदम,दिनेश शिळ्ळे,जयंत सलगर, मल्टीस्टेट चेअरमन संदेशकुमार दोशी,सुरज पाटील यासह संचालक मंडळ यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close