सरकारी जागेत खाजगी व्यवसाय..!! पंढरपूर बसस्थानक पुन्हा आले चर्चेत..
अधिकाऱ्यांचा आशीर्वाद अन् सरकारी जागेचा असाही वापर? नागरिकांत चर्चा
संपादक – दिनेश खंडेलवाल
सरकारी जागेत खाजगी व्यवसाय..!!
पंढरपूर बसस्थानक पुन्हा आले चर्चेत..
अधिकाऱ्यांचा आशीर्वाद अन् सरकारी जागेचा असाही वापर? नागरिकांत चर्चा
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर बसस्थानक या ना त्या कारणाने कायमच चर्चेत असते.या ठिकाणाहून चालणाऱ्या खाजगी प्रवासी वाहतुकीमुळे, सबंध राज्यात या बसस्थानकाची चर्चा झाली आहे. यातच येथील चंद्रभागा यात्रा बसस्थानक परिसरात चक्क खाजगी व्यवसाय थाटल्याचे दिसून आले आहे. या खाजगी व्यवसायास येथील आगार प्रमुखाचा नक्कीच आशीर्वाद असणार , याची खात्री आंधळा माणुसही देईल, अशी चर्चा पंढरपूरमधील नागरिकांमधून होत आहे.
पंढरपूर हे राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असल्याने, या ठिकाणी दररोज एक लाख भाविक येजा करीत असतात. पंढरपूर शहरात वर्षातून चार मोठ्या यात्रा भरतात. या यात्रांमध्ये चार ते बारा लाख भाविक येत असतात. या अतिरिक्त भाविकांसाठी पंढरपूर शहरात भव्य असे चंद्रभागा यात्रा बसस्थानक बांधण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवासी यात्रेकरूंच्या राहण्याचीही सोय करण्यात आली आहे .यात्रा सोडून इतर वेळी हे बांधकाम रिकामेच असते. याचा कोणताही वापर व्यावसायिक अगर व्यापारी कामासाठी होत नाही. ही जागा सरकारी असल्याने खाजगी कारणासाठी वापरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
मात्र गेल्या काही दिवसांपासून या चंद्रभागा यात्रा बसस्थानकावर, एका चारचाकी शोरूम धारकाने ,ग्रामीण महोत्सव भरवला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या चार चाकी गाड्या डेमोसाठी ठेवण्यात आल्या असल्याचे दिसून येते. चंद्रभागा यात्रा बसस्थानकाची ही सरकारी जागा, या खाजगी व्यावसायिकांने कोणाच्या सांगण्यावरून निवडली ? पंढरपूर येथील बसस्थानक प्रमुखाची या व्यवसायास मान्यता आहे काय ? असे अनेक प्रश्न येथील नागरिकांना पडले आहेत. पंढरपूर नगरपरिषदेच्या जागांवर अतिक्रमण करणे, हे जसे राजकारण्यांच्या संमतीनुसार होत नाही , त्याच पद्धतीने हा खाजगी व्यवसाय बसस्थानका सारख्या सरकारी जागेत चालतोय काय ? बसस्थानक प्रमुखाच्या संमतीशिवाय ही गोष्ट शक्यच नाही, अशी चर्चा पंढरपूरच्या जनतेतून होऊ लागली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी अशा प्रकाराकडे वेळीच लक्ष देऊन कोणती कारवाई करणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
[ खाजगी प्रवासी वाहतुकीमुळे नेहमी
चर्चेत असलेले पंढरपूर बस स्थानक पुन्हा एकदा वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. येथील बस स्थानक प्रमुखाच्या ताब्यात असलेल्या चंद्रभागा यात्रा बस स्थानकावर एका खाजगी व्यावसायिकांने आपला व्यवसाय थाटला आहे. हा कोणाच्या आशीर्वादाने? असा प्रश्न उपस्थित होतोय. बसस्थानक परिसरात साधे चहाचे कॅन्टीन उभा करावयाचे असल्यास, मोठी प्रोसेस पार पाडावी लागते. परंतु येथील चंद्रभागा बसस्थानक परिसरात येथील एका शोरूम धारकाने आपला व्यवसाय थाटात चालवला आहे. या खाजगी व्यावसायिकास हा व्यवसाय थाटण्यासाठी कोणी परवानगी दिली ? परवानगी दिली नसेल तर कारवाई होणार का? याकडे पंढरपूरमधील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. ]