सामाजिक

पंढरीत मनसे व वीरशैव महिला मंडळातर्फे दिवाळी एक्स्पो

दोनशे स्टाॅलच्या माध्यमातून ग्राहकांसाठी दिपावलीची होणार खरेदी

मुख्य संपादक-दिनेश खंडेलवाल 

पंढरीत मनसे व वीरशैव महिला मंडळातर्फे दिवाळी एक्स्पो

दोनशे स्टाॅलच्या माध्यमातून ग्राहकांसाठी दिपावलीची होणार खरेदी

पंढरपूर(प्रतिनिधी):- महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आद्य वीरशैव महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महिला उद्योजकांसाठी पंढरपूर मध्ये भव्य असा मनसे एक्स्पो घेऊन दिपावलीची खरेदी एकाच ठिकाणी पंढरपूर व मंगळवेढा शहर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना करता येणार आहे. 

ग्राहकांसाठी दिवाळी निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम येथील टिळक स्मारक मैदानावर दिनांक १९,२० ऑक्टोबर २०२४ रोजी भरवण्यात आला आहे. 

यामध्ये भाग घेणाऱ्या महिला उद्योजकांसाठी मोफत स्टॉल व स्टॉल उभारण्यासाठी बिन व्याजी कर्ज मनसेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी स्टॉलची बुकिंग करावी असे आवाहन मनसे नेते दिलीपबापू धोत्रे आणि डॉक्टर शोभा कराळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

यावेळी मनसेचे पदाधिकारी व आद्य वीरशैव महिला मंडळाचे अध्यक्ष डॉ. सौ.शोभा कराळे, सौ.सुवर्णा स्वामी, सौ.आरती पावले, सौ.कविता पावले, सौ. विशालाक्षी पावले, सौ.संजीवनी ठीगळे, सौ.मनीषा वासकर, सौ.अनुराधा स्वामी उपस्थित होत्या. 

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा. नागरिकांना दिवाळीची खरेदी एकाच छताखाली करता यावी. या उदात्त हेतूने महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आद्य वीरशैव महिला मंडळाच्या वतीने पंढरपुरात प्रथमच दिवाळीची खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे. 

या एक्सपो मध्ये २०० स्टॉल उभारण्यात येणार असून यामध्ये भाग घेणाऱ्या महिलांना नाम मात्र नोंदणी फी १०१/- ठेवण्यात आली आहे. 

भाग घेणाऱ्या महिला भगिनींना मोफत सुसज्ज स्टॉल दिले जाणार आहेत. तसेच महिलांना २५ हजार रुपये स्टॉल उभारण्यासाठी कर्ज स्वरूपात बिन व्याजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कर्ज एक्स्पो संपल्यानंतर भरावे लागणार आहेत. याला कोणतेही रक्कम आकारली जाणार नाही.

 यामध्ये भाग घेणाऱ्या महिलांना नाव नोंदणी ५ ऑक्टोबर पर्यंत करता येणार आहे. प्रथम येणाऱ्या महिलांना यामध्ये संधी दिली जाणार आहे. 

दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम मनसेच्या वतीने येथील टिळक स्मारक मैदानावर घेण्यात आला आहे. तरी पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील बचत गट व लघु उद्योग महिलांनी भाग घ्यावा असे आवाहन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी केले आहे. 

यावेळी शहराध्यक्ष संतोष कवडे, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, मार्गदर्शक संदीप रणवरे, महेश पवार, ओंकार जाधव, शशिकांत पाटील, समाजसेवक बाबा चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close