राजकिय

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत कोणाचे पारडे होणार जड! मतदारांचा कौल कोणाला मिळणार?

नगरसेवक पदाच्या ३६ उमेदवारांचा असा आहे अंदाज !

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत कोणाचे पारडे होणार जड! मतदारांचा कौल कोणाला मिळणार?

नगरसेवक पदाच्या ३६ उमेदवारांचा असा आहे अंदाज !

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काल झालेल्या मतदानात मतदारांचा कौल कोणाला मिळणार अन् कोणाचे पारडे जड होणार याबाबत उत्सुकता कार्यकर्त्यामध्ये व नागरिकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.

पंढरपूर नगर परिषदेमध्ये भाजपने नगराध्यक्ष सह छत्तीस नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडीनेही नगराध्यक्ष पदासह ३६ नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरवल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने निवडणुकीचे वातावरण तापले होते. दरम्यान या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची चुरस पहायला मिळाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी कोणाचे नशीब चमकणार मतदार राजा कोणाच्या पारड्यात मतदानाचा आशीर्वाद देणार याबाबत आता शहरांमध्ये चर्चा होत असून पैजाही लागू लागल्या आहेत.

पंढरपूर शहरांमध्ये प्रत्येक प्रभाग व बूथ वर झालेल्या मतदानात ज्या ठिकाणी उमेदवारांची संख्या जास्त होती अशा ठिकाणी क्रॉस मतदान झाल्याचे कार्यकर्त्यातून बोलले जात असले तरीही अपक्ष उमेदवारांनी प्रचारात कस लावल्यामुळे निवडून येणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

अनेक ठिकाणी प्रभागांमध्ये मतदार राजा अपेक्षा पूर्ण होत नसल्याने मतदानासाठी बाहेर पडला नव्हता परंतु अखेरच्या क्षणांमध्ये अपेक्षा पूर्ण होताच मतदान बुथवर गर्दी वाढू लागली व हीच गर्दी उमेदवारांना विजयापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. त्यामुळे ज्या प्रभागात मतदानाची टक्केवारी जास्त झाली आहे त्या प्रभागात विजय कोणाचा असेल याबाबत कार्यकर्त्यातूनही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शहरांमध्ये कार्यकर्त्यातून मतदारातून विविध चर्चेला उधाण येत असून प्रत्येक ठिकाणी मतदानाबाबत चर्चा होताना दिसते. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून २१ डिसेंबर रोजी कोण विजयी होणार, कोणाचे पारडे जड होणार, मतदार राजांचा आशीर्वाद व कौल कोणाला मिळणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

[ कोणाला किती जागा मिळणार? असा आहे अंदाज…….
नगराध्यक्ष पदासाठी काही भागात अत्यंत चुरशीची तर काही भागात काटे की टक्कर अशा परिस्थितीत मतदान झाल्याचे समजते त्यामुळे येथील अंदाज गुलदस्त्यात आहे.
भाजप नगरसेवक उमेदवारांना २२ ते २४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जातो तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीला आठ ते दहा जागा मिळतील त्याचबरोबर चार जागा अपक्ष उमेदवार यांना मिळणार असल्याचा अंदाज सुत्रांकडून व्यक्त होताना दिसत आहे. ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close