अवैध वाळू विरुद्ध पोलिसांची कारवाई;एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर तालुका पोलिसांनी जेसीबी, हायवा, ट्रॅक्टर, १५ ब्रास वाळू सह ६ आरोपींना घेतले ताब्यात

संपादक – दिनेश खंडेलवाल
अवैध वाळू विरुद्ध पोलिसांची कारवाई;एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर तालुका पोलिसांनी १ जेसीबी, हायवा ट्रक, ३ ट्रॅक्टर, १५ ब्रास वाळू सह ६ आरोपींना घेतले ताब्यात

पंढरपूर(प्रतिनिधी):- गेल्या अनेक महिन्यापासून पंढरपूर तालुक्यात अवैद्य वाळू उपसा व वाहतूक होत असल्याने यावर कारवाईसाठी पोलिसांनी सापळा लावला परंतु अनेक वेळा पोलीस पोहचेपर्यंतच वाळू माफिया पसार होत होते. अखेर आज पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे या गावांमध्ये पोलिसांनी पहाटे च्या सुमारास कारवाई करत एक कोटीचा मुद्देमाल जप्त केला तर सहा जणांविरोधात कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
![]()
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे या गावांमध्ये अवैद्यरित्या वाळू उपसा व वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी कारवाई करण्यासाठी पथकाला रवाना केले. सकाळी सहा वाजनेचे सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी मौजे चिंचोली भोसे या भागात अवैध वाळूचा उपसा होत असल्याची खात्री करून व मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून चिंचोली भोसे या गावांमध्ये धाड टाकली असता त्या ठिकाणी अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी, त्याचप्रमाणे अवैध वाळू भरलेले एक हायवा ट्रक, तीन ट्रॅक्टर अशी ५ वाहने व एकूण १५ ब्रास वाळू असा सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला.

या ठिकाणी केलेल्या धाडसत्रात आरोपी धनाजी गंगाधर दगडे (वय 36 वर्ष) राहणार गुरसाळे,विजय उर्फ राजू शंकर आडगळे राहणार गार्डी,उमेश बाबुराव बोबडे राहणार गुरसाळे, गणेश बापू सोनवणे,शंकर नवनाथ नवगिरे दोघे रा.चिंचोली किशोर शिवदास आवटे राहणार चिंचोली भोसे अशा एकूण सहा आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून सदरचा गुन्हा बी एन एस कलम ३०३, बी एन एस कलम ३०५, बी एन एस कलम ३,५ अन्वये एकूण सहा आरोपींच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर वाळू तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या विरोधात त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्याचा अभिलेखाचे अवलोकन करून कठोर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत प्रस्तावित कारवाई ची तजवीज ठेवण्यात आली आहे अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली.
![]()
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर,एपीआय रेळेकर,पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, सहाय्यक फौजदार आबा शेंडगे, पोलीस हवालदार चंद्रकांत घंटे, इसाक सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम, ब्रह्मदेव काळे, गुटाळ, पोलीस चालक हसन नदाफ, घाडगे यांच्या पथकाने केलेली आहे.



