क्राइम

पंढरपूर तालुक्यात अवैद्य प्रतिबंधीत गुटखा, सुगंधित तंबाखु वर कारवाई

सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांचे पथकाने १४ लाखाचा मुदद्देमाल केला जप्त

संपादक – दिनेश खंडेलवाल

पंढरपूर तालुक्यात अवैद्य प्रतिबंधीत गुटखा, सुगंधित तंबाखु वर कारवाई

सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांचे पथकाने
१४ लाखाचा मुदद्देमाल केला जप्त

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित तंबाखू अवैधरित्या आणून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकांना समजताच त्यांनी सापळा लावून पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे सुमारे १४ लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा सुगंधित सुपारीवर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपूर तालुक्यातील मौजे लक्ष्मी टाकळ येथे टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहनात प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू, अवैधरीत्या वाहतुक करीत असले बाबत गोपनीय माहिती पथकाला मिळालेने सदर ठिकाणी पोलीस पथकाने छापा कारवाई केली.

मौजे लक्ष्मी टाकळी ममता हॉस्पीटल समोर रोडवर टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहनात वरील बाजु न दिसण्याकरीता पिवळया रंगाच्या ताडपत्रीने बांधून जात असताना संशयास्पद पध्दतीने मिळून आला. दरम्यान सदर वाहनास पोलीस पथकाने थांबवून खात्री केली असता वाहनामध्ये मानवी शरीरास अपायकारक असलेले प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखूचे ५०० ग्रॅम वजनाचे पॉफिट असे ३० ठिक्यामध्ये भरुन वाहतूक करत असताना मिळून आले.

सदर पाकीटची खात्री केली असता त्यामध्ये मानवी शरीरास अपायकारक असलेले प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू मिळून आली. सदर मालाची एकुण किंमत ९ लाख रुपये असून टाटा कंपनीचा छोटा हत्ती एम.एच.१३.डी. क्यू. १९५८ किंमत ५ लाख रुपये असा एकुण १४ लाख रुपये किंमतीचा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिस पथकाने केलेल्या कारवाईत वाहन चालक सुनिल पांडूरंग गावडे रा. नागनाथ मंदिराजवळ, मोहोळ, दादा वसंत मोहरे रा. नागनाथ मंदिराजवळ, मोहोळ असे बेकायदेशीर माल वाहतूक करताना मिळून आलेले आहेत. सदर मालाबाबत खात्री केली असता सदरचा माल हा पंढरपूर येथील गणेश पंडीत रा. येळे वस्ती, तसेच तुकाराम कोळी यांना देणेकरीता घेवून आल्याचे आरोपींनी कबुल केले आहे. त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस पो. ठाणे गुरन ७३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २२३,२७४,२७५,१२३ सह अन्न सुरक्षा व मानके का. २००६ चे कलम २६ (२) (i) (ii), २६ (२) (iv), २७ (३) (E), ५९ वगैरे प्रमाणे वरील ४ इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण चे अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहा पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अब्दुलहमीद शेख, पोह निलेश रोंगे, पोह महेश कांबळे, पोकोंराहुल लोंढे, पोकों विनोद शिंदे यांनी पार पाडलेली आहे.

[ पंढरपूर शहर व तालुक्यात अवैद्यप्रकारे विक्री होणारे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारी जर कोठे विक्री होत असेल अथवा वाहतूक केली जात असेल तर त्याची माहिती कळवावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close