संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा – संतोष पवार
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूची सी.बी.आय मार्फत चौकशी करावी पंढरपूर रिपाइंची मागणी
संपादक – दिनेश खंडेलवाल
संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा – संतोष पवार
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूची सी.बी.आय मार्फत चौकशी करावी पंढरपूर रिपाइंची मागणी
पंढरपूर(प्रतिनिधी):- परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या समोरील प्रतिकात्मक संविधान पत्रिकेची विटंबना करून नासधूस करणाऱ्यावर व संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज तहसील कार्यालयावर आरपीआय आठवले गटाच्या वतीने निदर्शने करून करण्यात आली. यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सी.बी.आय मार्फत चौकशी करावी अशी मागणी पंढरपूर तालुका रिपाइं अध्यक्ष संतोष पवार यांनी केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पंढरपूर तालुका व शहर च्या वतीने पंढरपूर तहसील समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सचिव सुनील सर्वगोड ,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आप्पासाहेब जाधव, पश्चिम महाराष्ट्र सचिव बाळासाहेब कसबे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार भोसले, शहराध्यक्ष अॅड.कीर्तीपाल सर्वगोड ,शहर कार्याध्यक्ष विजय खरे, दयानंद बाबर तालुका सरचिटणीस, सचिन गाडे शहर सरचिटणीस, सचिन भोसले तालुका कार्याध्यक्ष, संदेश माने जि.युवक संघटक, विशाल मांदळे युवक श.अध्यक्ष,निलेश जाधव आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन देऊन न्याय मागण्यात आले.
लोकशाही मार्गाने शांततेत बंद आंदोलन यशस्वी झालेनंतर जातियवाद्यांनी संविधान प्रेमी आंदोलनास गालबोट लावण्यासाठी परभणीमध्ये बेकायदा जमाव जमवून दंगल करणाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी. तसेच कोबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी निरपराध जखमी अवस्थेतील महिला-पुरूष-युवकांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्यांचे तत्काळ गुन्हे मागे घेण्यात यावे., संविधानाचे समर्थनार्थ आंदोलन, वकिलांचे शिक्षण घेणाऱ्या दिवंगत सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांचेवर खोटे गुन्हे दाखल करून पोलिस कोठडीमध्ये असताना पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे न्यायालयीन कोठडीत मृत्यु झाला. त्यांची सी.बी.आय.मार्फत चौकशी करावी अशी मागणी पंढरपूर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने करण्यात आली.
सदर प्रकरणी झालेल्या घटनेचा तिव्र निषेध करून शासनाने याची त्वरीत दखल घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी भैय्या फडतरे, बत्तास वनसाळे, विशाल कसबे सरपंच, विक्रम चंदनशिवे, पोपट क्षीरसागर, आकाशभैय्या शिंदे, नितीन गायकवाड, समाधान आठवले, रुपेश वाघमारे, महादेव सोनवणे,राघु भोपळे, आण्णा कांबळे, दत्ता वाघमारे, अमर फडतरे सह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.