राज्य

पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी रामचंद्र सरवदे यांची फेर नियुक्ती

संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी केलेल्या कामामुळे केली निवड

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी रामचंद्र सरवदे यांची फेर नियुक्ती

संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी केलेल्या कामामुळे केली निवड

पंढरपूर(प्रतिनिधी):- गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांसाठी त्यांच्या हिताकरता वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलनं, उपोषणं केली. प्रसंगी निवेदन देऊन तसेच राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून कामाबाबत पाठपुरावा करत न्याय मिळवून देण्याचे काम केले. त्यांनी केलेले या कामाचे पावती म्हणून त्यांना पत्रकार सुरक्षा समिती या संघटनेच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी रामचंद्र सरवदे यांची सर्वानुमते फेर नियुक्ती करण्यात आली.

पत्रकार सुरक्षा समिती च्या माध्यमातून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना, आरोग्य योजना, विमा योजना, पत्रकारांसाठी घरकुल योजना, ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास, पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट, राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती, यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती तसेच खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी करून पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यात आक्रमक व प्रभावीपणे काम करत आहे.

पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे यांची फेर नियुक्ती केली असून लवकरच त्यांचा ओळख पत्र नियुक्ती पत्र शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली आहे. जेष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्यकारी प्रदेश अध्यक्ष पदी फेर नियुक्ती झाल्याने रामचंद्र सरवदे यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close