पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी अद्यापही भाजपकडून वेट अँड वॉच
नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण?,अनेक तर्कवितर्कांने चर्चेला उधाण!

संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी अद्यापही भाजपकडून वेट अँड वॉच
नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण?,अनेक तर्कवितर्कांने चर्चेला उधाण!
![]()
पंढरपूर(दिनेश खंडेलवाल):- पंढरपूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजप कडून अर्ज भरण्यासाठी दोन दिवस असताना सुद्धा कार्यकर्त्यातून संभ्रमावस्था दिसून येत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष च्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर होणार असे सांगितले. दरम्यान आज अखेरचा दिवस असतानाही अद्याप पर्यंत भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत नाव जाहीर करण्यासाठी वेट अँड वॉच पद्धत अवलंबली जात असल्याने याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
![]()
तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून डॉ. प्रणिताताई भगीरथ भालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून भाजप समोर आव्हान उभे केले आहे. पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होण्याचे संकेत मिळत असताना आता मात्र ही निवडणूक एकास एक अशी दुरंगी होणार? का फूट पडून पुन्हा तिरंगी होणार? याबाबतही आता चौका चौकात चर्चा सुरू झाली आहे.

अपक्ष म्हणून तीन उमेदवार व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एक असे नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बंडखोरी होण्याची शक्यता ध्यानात घेऊन भाजपने मात्र आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अद्यापही जाहीर केला नाही तसेच नगरसेवक पदाचा उमेदवार ही जाहीर केला नसल्याने इच्छुक उमेदवारा मधून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत धाकधूक सुरू झाली आहे. भाजपने घेतलेल्या मुलाखतीमध्ये प्रत्येक प्रभागातून नगरसेवक पदाकरता आठ ते दहा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असल्याने सर्वच इच्छुक नगरसेवक उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत लक्ष ठेवून आहेत.
![]()
भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी शामलताई शिरसाट,वैशालीताई वाळूजकर, साधनाताई भोसले या तीन नावांची चर्चा असली तरीही आज ऐनवेळी नवीन नाव समोर आले तर आश्चर्य वाटायला नको असे जाणकारांतून बोलले जात आहे.
![]()
उमेदवारांच्या मुलाखतीनंतर आपल्या नेत्याच्या शब्दाबाहेर आपण जाणार नसून आपले नाव उमेदवार म्हणून घोषित न झाल्यास आपल्या नेत्याकडून जे नाव जाहीर होईल त्यांच्यासाठी प्रचार करून निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आता इच्छुकातून बोलले जाऊ लागले आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधूक व संभ्रमावस्था दिसून येत आहे. उमेदवारांसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची निवडणूक सोपी नसून अटीतटीची होणार असे दिसत आहे.


