ईतरराज्य

पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी सौ. आरती बसवंती या शिवसेना शिंदे गटाकडून प्रमुख दावेदार

पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपली उमेदवारी - सौ. आरती बसवंती

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी सौ. आरती बसवंती या शिवसेना शिंदे गटाकडून प्रमुख दावेदार

पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपली उमेदवारी – सौ. आरती बसवंती

पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यात नगर परिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर नगरसेवकांबरोबर जनतेतून नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. पंढरपूर शहरासाठी नगराध्यक्ष पदाकरता शिवसेना शिंदे गटातील सौ. आरती ओंकार बसवंती शिवसेना महिला आघाडी सोलापूर जिल्हा प्रमुख या दावेदार मानले जातात.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळावी याकरता आपण अर्ज केला असून महिला आघाडीच्या प्रमुख नीलम ताई गोरे यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी तयारीला लागा असे आदेश दिल्याने पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच तीर्थक्षेत्राला उच्च दर्जा प्राप्त व्हावा याकरता आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. येणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी आपली लढत दावेदार असल्याचे सौ. आरती बसवंती यांनी सांगितले आहे.

पक्षाच्या वतीने आज सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक होणार असून या बैठकीमध्ये आपण प्रमुख दावेदार आहोत. नगराध्यक्ष पदाकरता आपण प्रचाराला ही सुरुवात केली असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपले काम सुरू आहे. मात्र आजच्या बैठकीत याविषयी शिक्का मोर्तब होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

त्यामुळे पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असले तरीही इच्छुकांमधून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close