मोहोळ मतदारसंघात राजाभाऊ खरे यांचा ३० हजारांच्या फरकाने विजय
मतदार संघातील केलेल्या विकास कामामुळे आणि आणलेल्या निधीमुळे मिळाला विजय

संपादक – दिनेश खंडेलवाल
मोहोळ मतदारसंघात राजाभाऊ खरे यांचा ३० हजारांच्या फरकाने विजय
मतदार संघातील केलेल्या विकास कामामुळे आणि आणलेल्या निधीमुळे मिळाला विजय
पंढरपूर(प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी ३०,२०२ मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महायुतीतील अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना ९५,६३६ इतकी मते मिळाली. मोहोळ विधानसभेच्या या निवडूकीत खूपच नाट्यमय घडामोडी घडल्या. अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यानी मतदानाच्या दोन दिवस अगोदर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ खरे यांना आपला पाठिंबा जाहीर केल्यामुळे महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या विरुद्ध झालेल्या लढतीत राजाभाऊ खरे यांचा पहिल्याच निवडणुकीत ३० हजारांच्या फरकाने विजय सुखकर झाला.
यंदा महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत माने पुन्हा एकदा मैदानात उतरवले होते तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमदार रमेश कदम यांच्या मुलीला प्रथम उमेदवारी दिलेली होती. पण अचानक ती उमेदवारी बदलून राजाभाऊ खरे यांना दिली एकंदरीत पहिल्यांदाच या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यात काटे की टक्कर असे नवीन चित्र पाहायला मिळाले.
यामध्ये महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे राजाभाऊ खरे यांना १ लाख २५ हजार ८३८ इतकी मते मिळाली तर महायुतीचे अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने यांना ९५ हजार ६३६ इतकी मते मिळाली. यामध्ये राजू खरे हे ३० हजार २०२ मतांचे मताधिक्य घेऊन विजयी झाले.
– राजाभाऊ खरे (नूतन आमदार) ]