धानोरा येथील अमोल शेळके २०२२ मध्ये मास्को, रशिया मधील इंटरनॅशनल ग्रापलीग चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार
दोन वेळेस नॅशनल, गोल्ड, सिल्वर व इतर पदक,शिर्डी येथे २३ डिसेंबर २०२१ रोजी १४ वी नॅशनल ग्रापलींग चॅम्पियन शिप मध्ये सुवर्णपदक

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
आष्टी बीड:- प्रतिनिधी-गोरख मोरे : आष्टी तालुक्यातील (जिल्हा बीड) मौजे धानोरा येथील रहिवासी गोरख देवराव शेळके (सहाय्यक पोलीस निरीक्षक )C I D सध्या स्थायिक शिवाजी नगर पुणे यांचे चिरंजीव अमोल गोरख शेळके याने नुकतेच २३ डिसेंबर २०२१ रोजी शिर्डी येथे १४ वी राष्ट्रीय ग्रापलींग चॅम्पियनशिप मध्ये ८० किलो वजनी सीनियर कॅटेगरी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले असून, यापूर्वीही दोन वेळेस नॅशनल चॅम्पियनशिप व गोल्ड, सिल्वर व इतर पदक पटकावले आहे .
२०२२ मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल ग्रापलीग चॅम्पियन शिप मास्को, रशिया स्पर्धेसाठी अमोल गोरख शेळके हा ८० किलो गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार असून अमोल शेळके यास या स्पर्धे साठी मार्गदर्शन संतोष देशमुख सर (ऑल इंडिया ग्रापलीग असोसिएशन चे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ) , तसेच आई आदीका गोरख शेळके, वडील गोरख देवराव शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून या सर्वांच्या मार्गदर्शनामुळेच सुवर्ण पदक पटकावले असल्याचे याप्रसंगी अमोल शेळके यांनी सांगितले असून अमोल शेळके यांचे गुरुवर्य देशमुख सर, आई, वडील, मित्र परिवार, सहकारी व धानोरा येथील सर्व ग्रामस्थांनी प्रथम अभिनंदन करून, मास्को, रशिया इंटरनॅशनल ग्रापलीग चॅम्पियन शिप स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अमोल गोरख शेळके यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
बातमी व जाहिरात साठी संपर्क- दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com