अनिल दादा सावंत यांना गोपाळपूरच्या जनतेंनी दिल्या आमदारकीच्या शुभेच्छा
म्हशी पळवण्याच्या खेळाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देणार - अनिल दादा सावंत

संपादक – दिनेश खंडेलवाल
अनिल दादा सावंत यांना गोपाळपूरच्या जनतेंनी दिल्या आमदारकीच्या शुभेच्छा
म्हशी पळवण्याच्या खेळाला राष्ट्रीय दर्जा मिळवून देणार – अनिल दादा सावंत
पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूरमध्ये गेल्या शंभर वर्षापासून दुचाकीच्या मागे म्हशी पळवण्याचा ऐतिहासिक खेळ खेळला जातो. याखेळाचे “भाऊबीज“ दिवशी आयोजन करण्यात येते. आज हा खेळ पाहण्यासाठी गोपाळपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार अनिल दादा सावंत हे आवर्जून उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल दादा सावंत म्हणाले की म्हशी पळवणे हा खेळ केवळ गोपाळपूर पुरता मर्यादित न राहता, राज्यभरात या खेळाला ओळख निर्माण व्हावी, या खेळाकडे राष्ट्रीय खेळ म्हणून पाहिले जावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
गोपाळपूरमध्ये माझी शेती असल्यामुळे मी याच गावाचा रहिवाशी आहे. येणाऱ्या काळात निश्चितपणे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाला विकासाच्या दृष्टीने एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शरद पवारांच्या विचाराचा हा मतदार संघ आहे. त्यामुळे पवार साहेबांवर प्रेम करणारी येथील जनता पंढरपूर मंगळवेढ्याचा होणारा आमदार हा त्यांच्याच विचाराचा निवडेल, असा विश्वास यावेळी अनिल दादा सावंत यांनी व्यक्त केला.
यावेळी गोपाळपूरचे माजी सरपंच शिवाजीराजे आसबे, गोपाळपूरचे विद्यमान सरपंच विक्रम आसबे यांनी स्वागत करत सन्मान केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी विविध पदाधिकाऱ्यां बरोबर गोपाळपूर ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.