पंढरपुरात राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवड्याचे उत्साहात उद्घाटन
जीएसटी बाबत अपेक्षा व समस्या या विषयावर मार्गदर्शन

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपुरात राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवड्याचे उत्साहात उद्घाटन
जीएसटी बाबत अपेक्षा व समस्या या विषयावर मार्गदर्शन
पंढरपूर : अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या वतीने 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित 15 डिसेंबर ते 30 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवडा याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जीएसटी बाबत व्यापारी वर्गाच्या अपेक्षा व समस्या या विषयावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी विश्वंभर पाटील जिल्हाध्यक्ष
(जिल्हा करसल्लागार संघटना सोलापूर) तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत सहकोषाध्यक्ष विनोद भरते सर, जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास,जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा संघटक दीपक इरकल सर,जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर व पांडुरंग अल्लापूरकर, तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,संघटक महेश भोसले सर,सचिव धनंजय पंधे,लंगोटे साहेब आदी पदाधिकारी व तालुका कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात
ग्राहक पंचायतीचे आराध्यदैवत स्वामी विवेकानंद व कै.बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली.
यावेळी विचार मांडताना प्रास्ताविकात दीपक इरकल सर यांनी ग्राहक पंचायतीची तत्वे सांगितली. जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देत पंधरवड्याच्या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी विश्वंभर पाटील यांनी जीएसटी बाबत व्यापारी वर्गाच्या असणाऱ्या अपेक्षा व समस्या या विषयावर मनोगत मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना विनोद भरते सर यांनी संघटनेची बांधणी व कार्यक्रमांचे काटेकोरपूर्ण नियोजन याबाबत आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटक महेश भोसले सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन तालुका सचिव प्रा.धनंजय पंधे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंढरपूर तालुका सहसंघटक आझाद अल्लापूरकर,सहसचिव दिलीप पाठक,तालुका कार्यकारणी सदस्य श्रीराम साळुंखे, किशोर खंडागळे, तेजस फडे,आदींचा सहभाग होता.