ईतर

पंढरपूर रांजणी मार्गावर खराब रस्त्यामुळे चार चाकी वाहन झाले पलटी

बांधकाम खात्याचे दुर्लक्ष; वाहनधारकातून संताप व्यक्त!

संपादक दिनेश खंडेलवाल

पंढरपूर रांजणी मार्गावर खराब रस्त्यामुळे चार चाकी वाहन झाले पलटी

बांधकाम खात्याचे दुर्लक्ष; वाहनधारकातून संताप व्यक्त!

पंढरपूर : पंढरपूर रांजणी या मार्गावर गोपाळपूरच्या पुढे गेल्यानंतर काही अंतरावरच आज दुपारी ब्रिजा ही चार चाकी वाहन खराब रस्त्यामुळे खड्यातून वाहन गेल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला वाहन पलटी झाले परंतु सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र या ठिकाणी असलेल्या खराब रस्त्यामुळे अनेक वेळा अपघात घडत असल्याचे घटनास्थळावरून बोलले जात होते.

यापूर्वीही या ठिकाणी अशाच प्रकारे चार चाकी वाहन पलटी होण्याची घटना घडली होती परंतु तरीही बांधकाम खात्याला जाग येत नसल्याने वाहनधारकातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.


पंढरपूर रांजणी या मार्गावर स्वेरी हे इंजिनिअरिंग कॉलेज असून या कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी आलेली विद्यार्थिनीचे हे वाहन होते. सदरचे वाहन हे कर्नाटक राज्यातील होते. यामध्ये दोन व्यक्ती बसले असता ज्यावेळेस कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातून कथड्याला लागून खड्ड्यात पडली त्यावेळी आतील दोघांनाही बाहेर काढण्यात आले. त्यांच्यासोबत एक कुत्र्याचे पिल्लू होते नागरिकांनी मदत कार्य केल्याने सर्व जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सदर रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले असून सतत वाहतूक सुरू असते रस्ता दुरुस्ती अथवा खड्डे बुजवण्यासाठी विविध संघटनांनीही आंदोलन केले होते तर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीही या रस्त्यासाठी आंदोलन केले होते. परंतु तरीही सदरचा रस्ता दुरुस्त अथवा चांगल्या क्वालिटीचा होत नसल्याने अनेक अपघाताचे प्रसंग घडताना दिसत असल्याचेही नागरिकांतून बोलले जात होते.


संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदरच्या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी वाहनधारकातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close