लोणीकाळभोर सराफ दुकान चोरी प्रकरणी कामगारास अटक
महाराष्ट्र व तेलंगणा सिमेवरुन पोलीसांनी केले जेरबंद
संपादक – दिनेश खंडेलवाल
लोणीकाळभोर सराफ दुकान चोरी प्रकरणी कामगारास अटक
महाराष्ट्र व तेलंगणा सिमेवरुन पोलीसांनी केले जेरबंद
लोणीकाळभोर(प्रतिनिधी):- लोणी काळभोर येथील सराफ व्यापाराच्या दुकानातून कामगारांनीच स्वतःच्या फायद्यासाठी दुकानातील सुमारे पाच ते सहा सोन्याच्या चेन चोरी करून पलायन केले. सदर घटनेचा तपास करताना लोणीकाळभोर पोलिसांनी महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवरती घटनेतील चोराला शिताफिने ताब्यात घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी लोणीस्टेशन परिसरातील ऐ.बी. के. अंबिका ज्वेलर्स सोलापुर पुणे हायवे रोड लगत असलेल्या दुकाना मधुन दि.२२/१२/२०२४ रोजी सायंकाळी ०४.०० वा. चे सुमारास दुकानातील कामगार अमोल विठ्ठल गवळी (वय २३ वर्षे) रा. पांडवदंड, फुरसुंगी, पुणे याने दुकानामधील काऊंटरचे खाली ठेवलेल्या बॉक्समधील एकुण रु. ४,३६,३९२/- किंमतीच्या सहा सोन्याचे चैन स्वतःचे फायदयाकरीता फिर्यादी यांचे संमतीशिवाय, अप्रामाणिकपणे, लबाडीचे इराद्याने चोरी करुन दुकानामधुन चोरीच्या उद्देशाने घेवुन गेलेबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमध्ये सदर दुकानाचे मालक बाबासाहेब वामन गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार गु.र.नं. ६०१/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास राजेंद्र करणकोट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे करीत असताना, गुन्हयाचे घटनास्थळ असलेल्या भागामधील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपास अधिकारी पुजा माळी, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी पाहिले. तसेच आरोपी राहत असलेल्या ठिकाणी आरोपीबाबत गोपनिय माहिती प्राप्त केली असता सदरचा आरोपी हा मुळचा महाराष्ट्र व तेलंगणा राज्य सिमेवरील देगलुर गाव जि. नांदेड येथील असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे परवानगीने पोलीस हवालदार योगेश कुंभार व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी देगलुर गाव जि. नांदेड याठिकाणी जावून तांत्रिक विश्लेषनाचे व गोपनिय माहितीचे आधारे आरोपी अमोल विठ्ठल गवळी (वय २३ वर्षे) यास महाराष्ट्र व तेलंगणा राज्य सिमेवरील मदनुर रोड, देगलुर ता. देगलुर जि. नांदेड येथुन गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीने दाखल गुन्हयात चोरी केलेल्या सहा सोन्याचे चैन असे किं.रु. ४,३६,३९२/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पुजा माळी या करीत आहेत.
सदरची कामगीरी ही अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त. परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली अश्विनी राख मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर, राजेंद्र करणकोट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे सुचनेप्रमाणे लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील लोणीस्टेशन पोलीस चौकी प्रभारी महिला पोलीस उपनिरीक्षक, पुजा माळी, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, पोलीस हवालदार योगेश कुंभार, पोलीस हवालदार तेजस जगदाळे, पोलीस हवालदार संभाजी देवीकर, पोलीस अंमलदार तुकाराम येडे व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.