सांगली शिक्षक बँंक व सोलापूर जिल्हा सोसायटी निवडणुकीत शिक्षक सहकार संघटनेची भुमिका निर्णायक -दिपक परचंडे
सोलापुरातील जिल्हास्तरीय बैठकीत निर्णय
संपादक-दिनेश खंडेलवाल
सोलापूर : सोलापूर येथे शिक्षक सहकार संघटनेची जिल्हास्तरीय बैठक राज्यसंघटक विठ्ठल टेळे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. शिक्षक बांधवांसाठी वरदायणी असणार्र्या सांगली बँक व सोलापूर जिल्हा सोसायटीची सध्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अनेक शिक्षक बांधवांनी निवडणुकीसाठीचे अर्ज भरलेले आहे. अशा वातावरणात येणार्र्या कालावधित शिक्षक सहकार संघटनेची निर्णायक भुमिका महत्वाची ठरणार असल्याचे मत संघटनेचे राज्यकार्याध्यक्ष दिपक परचंडे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील प्रस्थापित संघटनांचे पॅनल प्रमुख पाठिंबा मिळविण्यासाठी शिक्षक सहकार संघटनेच्या संपर्कात असल्याचे मत जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे यांनी सांगितले. तसेच शिक्षक बांधवांच्या हक्कासाठी,प्रश्नासाठी शिक्षक सहकार संघटना ही नेहमी राज्यस्तरावर प्रश्न मांडून सर्वसामान्य शिक्षकांना न्याय देण्यासाठी पाठपुरावा करून प्रश्न सोडवत असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र जेटगी यांनी आपल्या मनोगतामध्ये विचार मांडले.
या निवडणुकीत शिक्षक सहकार संघटनेची भुमिका ही महत्वाची असल्याने सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी हे आपापली जबाबदारी स्विकारून काम करण्याचे आवाहन जिल्हा सरचिटणीस सचिन निरगिडे यांनी सांगितले.
या सभेसाठी जिल्ह्यातील सहकार प्रेमी शिक्षक असंख्य संख्येने उपस्थित होते. ही सभा पुर्ण करण्यासाठी राजेंद्र पडदुणे, बजरंग कोळी,सुमंत मुंढे यांनी परीश्रम घेतले.