ईतर

थांबलेल्या मालट्रकवर कारची पाठीमागून धडक, मुंबईचे पिता-पुत्र अपघातात ठार;दोघे जखमी

सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ हद्दीत झाला अपघात

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

मोहोळ-राजेश शिंदे
मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी हद्दीत रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने जोराची धडक दिली. या अपघातात मुंबईचे पिता-पुत्र ठार झाले तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. कारमधील पिता दीपक दगडू उबाळे (वय ५०) व पुत्र राहुल दीपक उबाळे (वय २६,दोघेही रा.चेंबूर,मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. अमोल दीपक पवार (वय २६ ,रा . परळ, मुंबई) व चालक सुखदेव गजानन शिंदे ( रा . आंबेवाडी ठाणे ) अशी जखमींची नावे आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार उबाळे पितापुत्र तसेच अमोल पवार व चालक सुखदेव शिंदे हे इको कार ( क्र. एम. एच. ०४ / डी के १ ९ १३ ) मुंबईहून देवदर्शनासाठी तुळजापूरला निघाले होते. ते सर्वजण मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी जवळ आले होते. तेव्हा तेथील निलकमल हॉटेलसमोर रस्त्यावर मालट्रक ( क्र. एम. एच. ११ / ए. एल. ७१४ ९ ) थांबला होता. यावेळी चालक गजानन शिंदे याला गाडी थांबल्याचे लवकर लक्षात आले नाही. त्यामुळे त्याने पाठीमागून थांबलेल्या मालट्रकला जोरात धडक दिली.

या अपघातात दीपक उबाळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा राहुल उबाळे, अमोल पवार हे गंभीर जखमी झाल तर चालक शिंदे हाही जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच सावळेश्वर टोल नाक्याच्या पेट्रोलिंग पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तेथील ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सोलापूर येथे पाठविले. उपचारादरम्यान दुपारी राहुल उबाळे याचा मृत्यू झाला. अमोल पवार याचीही प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी टोलनाक्याचे व्यवस्थापक अमर डोंबे यांनी घटनेची माहिती मोहोळ पोलिसात दिली आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-              दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close