सामाजिक

सात वर्षापासून कार्यरत श्री विठ्ठल मंदिरे समिती बरखास्त करा – अर्जुनराव चव्हाण

संपादक – दिनेश खंडेलवाल 

सात वर्षापासून कार्यरत श्री विठ्ठल मंदिरे समिती बरखास्त करा – अर्जुनराव चव्हाण

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून समितीमध्ये सदस्य संख्या वाढवावी

पंढरपूर(प्रतिनिधी):- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सात वर्षे होऊन सुद्धा सदरची समिती बरखास्त करण्यात आली नसून जुने सदस्य भाविकांना सेवा देण्यात कमी पडत असून भाविकांना कमी वेळात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी तसेच भाविकांच्या दर्शन रांगेसोबत इतर सुविधांना प्राधान्य देऊन काम करणारी नवीन समिती नियुक्ती करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासन स्थापित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती बरखास्त करावी आणि सदस्य संख्या वाढवावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मातीचे दर्शन घेण्यासाठी पंढरीनगरीत दररोज हजारो भावीकभक्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात, राजस्थान येथून येत असतात. तसेच आषाढी व कार्तिक वारीला लाखों वैष्णवांची मांदीयाळी या भूवैकूंठ नगरीमध्ये अवतरते.

या ठिकाणी आलेला भाविक प्रथम चंद्रभागेचे स्नान करून विठ्ठल दर्शन करून प्रदक्षिणा मार्गावर प्रदक्षिणा पूर्ण करून वारी पोहोच करत असतो, ही परंपरा परंपरेने आजही सुरू असून या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या सोयी, सुविधांसाठी शासन स्थापित मंदिरे समिती सदैव कार्यरत असते. सध्या अस्तित्वात असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला स्थापन करून ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. आता ही समिती बरखास्त करावी आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या समितीमध्ये सदस्य संख्या वाढविण्याची तरतूद करावी. जर सदस्य संख्या वाढवली तर येणाऱ्या वारकरी भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल सुलभ आणि वेळेत दर्शन होण्यासाठी नियोजन करण्यात येईल तसेच मंदिर समितीकडे अनेकांनी विविध बाबतीत मागणी केली आहे. यावर अद्यापही विचार केला जात नाही. त्या सर्व बाबींवर विचार करण्याचा निर्णय घेता येईल तसेच अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांना या समितीवर नियुक्त करून सेवेची संधी देता येईल. अशी मागणी करणारे पत्र पंढरपूरचे प्रांत अधिकारी सचिन इथापे यांना मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आले.

यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मोरे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुमंत कदम, महिला जिल्हाध्यक्ष प्रभावती गायकवाड मॅडम, पंढरपूर शहराध्यक्ष अमोल पवार, तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे, शहर संघटक काका यादव, विभाग प्रमुख पांडुरंग शिंदे, रिक्षा संघटना अध्यक्ष नागेश गायकवाड, व्यापार उद्योग आघाडी अध्यक्ष नानासो शिंदे, शिक्षक आघाडी तालुका उपाध्यक्ष सोमनाथ बागल तसेच शहर सचिव सचिन थिटे, अमोल सुरवसे सह अ.भा.मराठा महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close