स्वामी विवेकानंदांच्या विचारांची युवकांनी प्रेरणा घ्यावी-शशिकांत हरिदास
ग्राहक पंचायतने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती केली साजरी

लोकपत्र न्यूज
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : बदलत्या जीवन शैलीमुळे सध्याच्या युवकांनी वाईट गोष्टीकडे वळण्यापेक्षा स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी त्याचबरोबर
ग्राहक चळवळीत तरुणांनी सामील व्हावे असे आवाहन अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांनी केले ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलत होते. सध्याच्या महिला वर्गांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या विचारांचे धडे आपल्या मुलांना देऊन त्यांच्यात संस्कार घडवावे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन शिवप्रतिष्ठानचे सुजित मोरे व राजेश बडवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य नंदकुमार देशपांडे, सुजित मोरे, राजेश बडवे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते, तालुका संघटक विनय उपाध्ये, उपाध्यक्ष पांडुरंग अल्लापूरकर, सहसंघटक महेश भोसले, सहसचिव प्रा. धनंजय पंधे, सदस्य श्रीराम साळूंखे, विनित पवार, वैजिनाथ जाधव इ.उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक दिनेश खंडेलवाल, पंढरपूर
mail -lokpatranewsppur123@gmail.com