सामाजिक

इंडियन नॅशनल पुरस्काराने पंढरीचे डॉ.शितल शहा सन्मानित

हैदराबाद येथे अखंड व अविरत बाल रुग्ण सेवेसाठी केला गौरव

संपादक – दिनेश खंडेलवाल

इंडियन नॅशनल पुरस्काराने पंढरीचे डॉ.शितल शहा सन्मानित

हैदराबाद येथे अखंड व अविरत बाल रुग्ण सेवेसाठी केला गौरव

पंढरपूर(प्रतिनिधी):- हैदराबाद येथे नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने देशभरातील विविध राज्यातील नामवंत डॉक्टरांना त्यांच्या अविरत योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. यामध्ये सोलापूर जिल्हयातील पंढरपूरच्या तिर्थक्षेत्रातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. शितल शहा यांचा पंचतारांकित हॉटेल मध्ये सन्मान करून गौरविण्यात आले. ही बाब सोलापूर जिल्ह्यासह तमाम पंढरपूरच्या नागरिकांसाठी सन्मानाची बाब आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन हैदराबाद येथील डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले होते. देशातील विविध राज्यांतील डॉक्टरांनी केलेल्या अविरत व अखंड रुग्ण सेवेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर, हिंगोली व पंढरपूर येथील डॉक्टरांचा समावेश होता.

सोलापूर जिल्ह्यातील डॉ. शितल शहा हे केवळ प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ नाहीत तर एक सहृदयी समाजसेवक सुद्धा आहेत. हजारों चिमुकल्यांना मृत्यूच्या दाढेतून परत काढून त्यांना जीवदान देणारे देवदूत अशी डॉ शहा यांची खरी ओळख आहे. सर्वसामान्य व तळागाळातील नागरिकांसाठी त्यांनी आपल्या दवाखान्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त यंत्रणा बसविण्यात धन्यता मानली यामुळे महाराष्ट्र नव्हे तर ईतर राज्यातून देखील हजारो पालक त्यांच्याकडे आपल्या बालकांना घेऊन उपचारासाठी येत असतात.

आपले मूल बरे झाले म्हणजे डॉ शितल शहा यांच्या रूपात साक्षात परब्रह्म पांडुरंगानेच आपल्या बालकाचे प्राण वाचवले अशी भावना पालकांची व रुग्ण नातेवाईकांची होते. त्यांच्या या कार्यामुळेच आज त्यांची ख्याती सर्वदूर पसरली आहे. विषेश म्हणजे अनेक गोरगरीब,दिनदुबळ्या लोकांकडून डॉ.शहा उपचारासाठी पैसे घेत नाहीत, तर उलट मुलांच्या औषधासाठी पैसे देतात. पुरस्कार स्वीकारून डॉ. शहा पंढरपूर येथे आले तेव्हा सर्व स्टाफ च्या वतीने त्यांचे फुलांच्या पायघड्या घालून जंगी स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close