पंढरीतील नवजीवन चिल्ड्रन्स हाॅस्पिटल मध्ये मोफत बालरोग निदान शिबिर
आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ४३९ बालकांची मोफत तपासणी

संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीतील नवजीवन चिल्ड्रन्स हाॅस्पिटल मध्ये मोफत बालरोग निदान शिबिर
आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त ४३९ बालकांची मोफत तपासणी
पंढरपूर : पंढरपुरातील लहान मुलांचे देवदूत समजले जाणारे सुप्रसिद्ध डॉक्टर शितल के शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत बालरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सुमारे ४३९ बालकांची मोफत वैद्यकीय तपासणी करून औषधे देण्यात आली.
या शिबिरामध्ये जन्मजात बालकासह अठरा वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत तपासणी करून औषधे दिली आहेत. त्याचबरोबर गंभीर स्वरूपाच्या उपचारासाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला.
या शिबिराचे उद्घाटन भैरवनाथ शुगरचे चेअरमन तथा प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर शितल के शहा यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्याने रुग्णांचे योग्य निदान तपासता येते. सकाळी दहा पासून दिवसभरात रुग्णांचे केस पेपर न काढता मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले.
सदर शिबिरा प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले, जन आरोग्य योजनेचे डॉक्टर भोपळे, डॉक्टर सुधीर आसबे, डॉक्टर पाटवा, डॉक्टर रविराज भोसले, डॉक्टर उत्पात, बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर देशमुख, पंढरपूर तालुका अध्यक्ष शिवाजी बाबर, शहराध्यक्ष मुन्ना भोसले सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[सदर शिबिराप्रसंगी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले रुग्णालय या नावाने पंढरपूर तालुक्यासाठी अद्ययावत ॲम्बुलन्स देण्यात आली या अंबुलन्स मधून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन वैद्यकीय तपासणी करणे सुलभ होणार आहे. सदर ॲम्बुलन्स तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले व डॉक्टर शितल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जावी असे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी सांगितले.]