राज्यसामाजिक

तिसऱ्या लाटेसाठी दक्षता : पंढरीत लसीकरण तपासणी मोहीम तीव्र; नियम मोडणार्यांवर दंडात्मक कारवाई

कोरोना नियम न पाळणार्‍यांवर दंडात्मक कारवाई- सह आयुक्त अशिष लोकरे

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : काल पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटर मधील गाळेधारक यांच्यावर मास्कचा वापर केला नाही म्हणून व लसीकरण केले नाही म्हणून सक्त ताकीद घेऊन दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली होती ही तपासणी मोहीम आज आणखी तीव्र करण्यात आली आज जिल्हाधिकारी कार्यालयाचे नगर विकास शाखेचे सहआयुक्त आशिष लोकरे यांनी मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या समवेत पंढरपूर शहरातील काही कापड व्यापारी व इतर दुकानांना विशेष तपासणी पथकाच्या मदतीने भेटी देऊन ज्यांनी लसीचे दोन डोस घेतलेले नाहीत व दुकान मालक व कर्मचारी तसेच खरेदीसाठी आलेले नागरिक हे मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आल्याने अशा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे व्यापारामध्ये खळबळ उडाली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत असलेल्या धडक मोहिमेचा धसका घेत अनेक व्यापारी यांनी स्वतः हुन त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना लसीचे डोस घेण्याबाबत व आलेल्या नागरिकांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे अशा सूचना येणाऱ्या नागरिकांना त्यांनी स्वतःहून दिल्या.

यावेळी बोलताना सह आयुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले की कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेच पाहिजेत जेणेकरून कोरोना रोखण्यास मदत होईल वारंवार जिल्हाधिकारी यांच्याकडून सूचना देऊनही आजही त्याची अंमलबजावणी नागरिक व व्यापारी करत नाहीत त्यामुळे कोराना विषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला व पंढरपूर नगरपालिकेने लसीकरणाची मोहीम तीव्र करावी जर कोणी कोरोना विषयक नियमाचे उल्लंघन करत असल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

आजची धडक मोहिमेची कारवाई सह आयुक्त आशिष लोकरे, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन चव्हाण,उमेश कोटगिरी,दर्शन,वेळापुरे, मधुकर क्षीरसागर यांनी केली.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-              दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close