ईतरसामाजिक

युटोपियन कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपत मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना केली आर्थिक मदत

मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना पेन्शन योजनेचा लाभ ही मिळवून दिला

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

मंगळवेढा : युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याचे सेवक कै.नवनाथ किसन लुगडे रा. हाजापूर ता. मंगळवेढा याचे दिनांक १३/१२/२०२० रोजी दु:खद निधन झाले होते. कै. नवनाथ लुगडे हा मनमिळावू व कार्यतत्पर म्हणून युटोपियन शुगर्स व परिसरामध्ये परिचित होता. त्यांच्या निधनाने युटोपियन शुगर्स मध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून ती आज तागायत भरून निघाली नाही.

कुटुंबातील कर्ता व्यक्ति असल्याने त्याच्या निधना नंतर त्यांच्या कुटुंबाची परवड होऊ नये या उद्देशाने नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या युटोपियन शुगर्स च्या वतीने नवनाथ लुगडे यांचे कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली.


कै. नवनाथ लुगडे हा युटोपियन शुगर्स येथे मागील ५ वर्षा पासून सेवक म्हणून कार्यरत होता. त्याच्या कार्यकाळा मध्ये त्याने अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून सेवा बजावत असताना प्रत्येक कार्यात तो हिरारीने अग्रभागी असायचा. अनेक बचत गटाच्या माध्यमातून त्याने हाजापूर व पाटखळ मध्ये मोठा जनसंपर्क विस्तारला होता. त्याच्या निधनाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करीत आहे. युटोपियन चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून लुगडे याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांची आर्थिक परवड होऊ नये या सामाजिक उद्देशाने युटोपियन शुगर्स व सर्व कर्मचारी यांनी १ दिवसाचा पगार देऊ केला आहे. तसेच भविष्य निर्वाह निधि सह एकत्रित रक्कम सुमारे ६ लाख ५० हजार रुपये व लुगडे यांच्या २ कन्या व पत्नी यांना पेन्शन योजनेचा लाभ ही कारखान्याच्या सहकार्यातून मिळवून दिला आहे.

कारखान्याच्या वतीने देण्यात येणार्या रकमेची कारखान्याने ठेव ठेवली असून आज त्या ठेवीच्या प्रमाण पत्रांचे प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या दिवशी कै. नवनाथ लुगडे याच्या घरी जाऊन कारखान्याचे चिफ फायनान्सीयल ऑफिसर दिनेश खांडेकर, सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांच्या हस्ते व हाजापूर चे माजी सरपंच माधवानंद आकळे,दिलीप लुगडे, सोमनाथ लुगडे,अर्जुन लुगडे यांच्या उपस्थितीत कै. लुगडे यांच्या पत्नी श्रीमती कोमल व आई श्रीमती सखूबाई लुगडे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-              दिनेश खंडेलवाल 8788544511                     Gmail-lokpatranewsppur123@gmail.com

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close