
संपादक – दिनेश खंडेलवाल
प्रभाग १० ब मधून वैभव शहाजी भोसले यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
प्रभागातील जनतेच्या पाठिंब्यावर माजी उमेदवारी – वैभव शहाजी भोसले

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर नगरपरिषदेच्या प्रभागा नुसार नगरसेवकांची उमेदवारी दाखल करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेमध्ये गर्दी वाढत आहे. आज प्रभाग क्रमांक दहा ब मधून वैभव शहाजी भोसले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरीही या प्रभागांमध्ये गेल्या नऊ वर्षाच्या कालावधीत म्हणावा असा कोणताही विकास झालेला नाही. अनेक ठिकाणची कामे अपूर्ण आहेत. नागरिकांच्या वाढत्या समस्या ध्यानात घेऊन तसेच नागरिकांच्या मतदारांच्या प्रभागातील जनतेच्या आग्रहासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवण्यासाठी तयारी केली आहे.

प्रभाग क्रमांक दहा ब मध्ये असलेल्या गटारी तुंबलेल्या आहेत. पिण्याचे पाण्याची समस्या सोडवण्यासाठी तसेच अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय व नादुरुस्त आहेत. मूलभूत गरजा या ठिकाणी जनतेला मिळत नसल्याने त्यांच्या या प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण तत्पर असून जनतेच्या पाठिंब्यामुळेच आज उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवणार आहे.

जनतेच्या सेवेसाठी २४ तास कार्यरत राहून काम करणार असल्याची ग्वाही अर्ज दाखल केल्यानंतर अपक्ष उमेदवार वैभव शहाजी भोसले यांनी दिली.


