आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर भाजपने ईडी सीबीआयचा गैरवापर करून तुरुंगात टाकले – एकनाथ फटे
मंगळवेढा तालुक्यातील आम आदमी पक्षाचा व पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंत यांना पाठिंबा

संपादक – दिनेश खंडेलवाल
आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर भाजपने ईडी सीबीआयचा गैरवापर करून तुरुंगात टाकले – एकनाथ फटे
मंगळवेढा तालुक्यातील आम आदमी पक्षाचा व पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंत यांना पाठिंबा
पंढरपूर(प्रतिनिधी):- आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर भाजपने ईडी सीबीआयचा गैरवापर करून तुरुंगात टाकले. संजय राऊत, अनिल देशमुख यारख्या एकनिष्ठ आणि निष्पाप नेत्यांनाही जेलमध्ये टाकले. उद्या भाजप सत्तेत राहिले तर तुमचे दुकान कधी बंद करायचे, आणि कधी चालू करायचे, हे भाजपवाले ठरवतील. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत येणे फार आवश्यक असल्याचं सांगत आपण ही लढाई निश्चित जिंकू, असा विश्वास तालुकाध्यक्ष एकनाथ फटे यांनी व्यक्त केला.
२५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार अनिल दादा सावंत यांना विविध पक्षासह संघटनेचा पदाधिकाऱ्यांचा जाहीर पाठिंबा मिळत आहे. नुकताच त्यांच्या विजयात भर पाडण्यासाठी मंगळवेढा आम आदमी पक्षानेही पाठिंबा जाहीर केल्याने कार्यकर्त्यात उत्साह शिगेला पोहोचला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील आम आदमी पक्षाचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष एकनाथ फटे मंगळवेढा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बाबर, मंगळवेढा शहराध्यक्ष भारत शिंदे यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल दादा सावंत यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्यासाठी जाहीर पाठिंबा दिला आहे.
निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासूनच अनिल सावंत यांना विविध पक्ष संघटनेकडून पाठिंबा मिळत आहे. नुकताच काँग्रेस पक्षाचा मंगळवेढा आणि पंढरपूर पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा लाभला. विविध पक्ष, समाज, संघटनांचा पाठिंबा लाभत असतानाच आता आप पक्षाचा पाठिंबा लाभल्याने त्यांच्या विजयाची खात्री निश्चित मानली जात आहे.