सामाजिक

कायद्याच्या जनजागृतीसाठी महत्वाचा घटक म्हणजे विधीस्वयंसेवक – न्यायाधीश महेश लंबे

सार्वजनिक ठिकाणी कायदेविषयक शिबीराचे आयोजन

संपादक-दिनेश खंडेलवाल

कायद्याच्या जनजागृतीसाठी महत्वाचा घटक म्हणजे विधीस्वयंसेवक – न्यायाधीश महेश लंबे

सार्वजनिक ठिकाणी कायदेविषयक शिबीराचे आयोजन

पंढरपूर : गावामध्ये, महाविद्यालयामध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी कायद्याचा प्रसार होणेसाठी कायदेविषयक शिबीराचे आयोजन केले जाते त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामार्फत विधी सेवा समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये न्यायाधीश, विधीज्ञ तसेच विधीस्वंसेवक यांची नेमणुक करण्यात येते.यामध्ये कायद्याचा प्रसार करणेसाठी विधीस्वंसेवक हा महत्वाचा घटक असलेबाबतचे गौरोउद्गार न्यायालयात आयोजित केलेल्या बैठकीवेळेस विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश महेश लंबे यांनी केले.

दर महिन्यामध्ये कायद्याचा प्रसार करणेसाठी खेडोपाडी, चावडीवर, शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी कायदेविषयक शिबीराचे आयोजन करुन कायद्येविषयक मार्गदर्शन केले जाते. सदर शिबीराचे पुर्वनियोजन करणेसाठी दर महिन्याच्या १ तारखेला अधिवक्ता संघाचे पदाधिकारी, सर्व न्यायिक अधिकारी तसेच समितीवरील विधीस्वंसेवक यांच्या बैठकीचे आयोजन केले जाते व त्या बैठकीमधुन शिबीराची दिनांक, शिबीराचे ठिकाण इत्यादी गोष्टींवर चर्चा केली जाते. सप्टेंबर महिन्यामध्ये शिबीराच्या पुर्वनियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.


सदर बैठकीस न्यायाधीश एम. बी. लंबे,बी. बी. तोष्णीवाल, श्रीमती एस. एस. पाखले, ए. ए. खंडाळे, एन. एस. बुद्रुक, एम. आर. कामत, पी. पी. बागुल, ए. एस. सोनवलकर, श्रीमती पी. एन. पठाडे, श्रीमती एस. ए. साळुंखे, तसेच पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष शशिकांत घाडगे, सचिव राहुल बोडके, विधीस्वयंसेवक सुनिल यारगट्टीकर, नंदकुमार देशपांडे, पांडुरंग अल्लापूरकर, अंकुश वाघमोडे, शंकर ऐतवाडकर तसेच विधीज्ञ आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close