ईतर

1060 सभासदांचे ऊस बिल बाकी असतांना विरोधक मात्र 25 हजार सभासदांचे देणे असल्याचा अपप्रचार करतात-भालके

जी.एस.टी.ची 16 कोटींची रक्कम ही टप्या-टप्याने भरण्याची परवानगी

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारा दरम्यान चेअरमन भगिरथ भालके मेंढापूर येथील प्रचार सभेत म्हणाले की 1060 सभासदांचे ऊस बिल बाकी असतांना विरोधक मात्र 25 हजार सभासदांचे देणे असल्याचे अपप्रचार करीत आहेत. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सभासदांच्या गाठीभेटी घेण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे,अजोती, खरातवाडी, भटुंबरे,पांढरेवाडी, बाभुळगांव व आढीव या गावांमध्ये प्रचार दौरा पार पडला.

यावेळी बोलतांना चेअरमन भगिरथ भालके म्हणाले की सन 2020-21 गळीत हंगामातील सभासदांचे ऊस बिल देण्यासाठी कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे जी.एस.टी.ची 16 कोटींची रक्कम ही टप्या-टप्याने भरण्याची परवानगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून घेतली असतांना संचालक युवराज पाटील यांनी याबाबत उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल करून कारखान्यास अडचण निर्माण केली. कारखाना अशा अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर आयुक्त पुणे यांच्या परवानगीने काही साखर व्यापारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करीत असताना यावेळीही युवराज पाटील यांनी अडथळा निर्माण केला. सभासदांचे ऊस बिल देण्याचे बाकी असले तरी यामधील काही सभासदांना थोड्या-फार प्रमाणात रक्कम कारखान्याकडून अ‍ॅडव्हान्सपोटी दिली असल्याचे चेअरमन भगिरथ भालके यांनी सांगितले.

यावेळी श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारासाठी सभासद बांधवांसमोर मनोगत व्यक्त करताना विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे चेअरमन सह.शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.का.लि. राजेंद्र शिंदे-व्हा.चेअरमन तसेच दोन्ही कारखान्याचे आजी माजी संचालक सर्वश्री गोकुळ जाधव, दशरथ खळगे, मारूती भिंगारे, महेश कोळेकर, दिलीप कोरके, विलास भोसले, भिमराव पवार,शहाजी साळुंखे, दिपक चव्हाण यांचेसह विठ्ठल परिवाराचे मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close