माघ यात्रेत मंदिर समितीस ३ कोटी ५० लाखाचे दान रुपी उत्पन्न
गतवर्षीच्या उत्पन्नापेक्षा यावर्षी २३ लाख रुपयांची वाढ

संपादक-दिनेश खंडेलवाल
माघ यात्रेत मंदिर समितीस ३ कोटी ५० लाखाचे दान रुपी उत्पन्न
गतवर्षीच्या उत्पन्नापेक्षा यावर्षी २३ लाख रुपयांची वाढ
पंढरपूर :- तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ यात्रेच्या जया एकादशी सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर समिती विविध रूपाने दिलेल्या दान रुपी उत्पन्ना मध्ये तीन कोटी पन्नास लाख बाविस हजार पाचशे एकोणीस रुपयाचे दान दिले आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
मागील वर्षी सोन्या-चांदीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र यावेळी सोन्या-चांदीचे उत्पन्न कमी प्रमाणात मिळाले असून हे उत्पन्न वगळता मंदिर समिती तेविस लाख सहा हजार एकशे बावन्न रुपयाचे दान रुपी उत्पन्न वाढले आहे.
माघ यात्रा ही माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपूरात साजरी केली जाते. सन २०२४ यावर्षी माघ एकादशी मंगळवार दि.२० फेब्रुवारी २४ रोजी संपन्न झाली. या यात्रेचा कालावधी माघ शुद्ध ०१ ते (दि.१०/०२/२०२४) ते माघ शुद्ध १५ (दि.२६/०२/२०२४) असा होता.
या यात्रा कालावधीत मंदिर समितीस विविध मार्गातून ३,५०,२२,५१९ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी ४,८८,६८,०२८ इतके उत्पन्न मिळाले होते. गतवर्षी सोने व चांदी भेट वस्तू उत्पन्न १,६६,६,१४६ रुपये इतके होते. यावर्षी सोने व चांदी भेट वस्तू ५,१५,८०५ एवढे किंमतीचे जमा झाले आहे. त्यामुळे सोने व चांदीचे उत्पन्न वगळता गतवर्षीच्या उत्पन्नापेक्षा २३,०६,१५२ इतके जास्त उत्पन्न झाल्याचे कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.