संपादक-दिनेश खंडेलवाल
वाखरी येथील पेट्रोल पंपा समोर टिपर दुचाकीचा अपघात
शेळवे येथील दुचाकी स्वराच्या हातावरून गेला टिपर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू;लहान मुलगी बचावली
पंढरपूर(प्रतिनिधी):- आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास वाखरी येथील गोसावी पेट्रोल पंपा समोर मुरूम घेऊन चाललेल्या टिपरने दुचाकी स्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या हातावरून टिपर गेले असून या अपघातात लहान मुलगी बचावल्याचे सांगितले जाते.
पंढरपूर कडे मुरूम घेऊन येणारा टिपर क्रमांक बीआर ०६/ जीसी ७३२१ याने दुचाकीवरून शेळवे येथील मोहन शिवाजी लोकरे हा आपल्या दुचाकीवरून पंढरपूर कडे निघाला असताना त्याच्या वाहनास टिपरने धडक देऊन वाहनावरून टिपरचे पुढील चाक गेल्याने दुचाकीचा चक्काचूर झाला असून मोहन लोकरे यांच्या हातावरून सदर वाहनाचे पुढील चाक गेल्याचे घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी कडून बोलले जात होते.
मोहन शिवाजी लोकरे हा वायरमेनची कामे करत होता तसेच एमएसईबी ची कामे करत असल्याची माहिती समजते. त्याच्यासोबत दुचाकी वर असलेली ऋतुजा मोहन लोकरे ही त्याची लहान मुलगी आश्चर्यकारकरीच्या वाचली आहे. येथील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी मोहन लोकरे यास दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी भरधाव वेगाने येणार्या टिपर मुळे यापूर्वीही अनेकांचे बळी घेतले असून पोलीस प्रशासनाने वाळू अथवा मरून घेऊन जाणाऱ्या भरधाव टिपरवर वेगाचे नियंत्रण ठेवावे, वेळप्रसंगी वेगाचे व हायगयीने वाहन चालवल्याचे गुन्हे दाखल करावेत अशी चर्चा ही नागरिकांतून होताना दिसून येत होती. टिपर चालकाचे आपल्या वाहनांवर नियंत्रण असते तर हा अपघात झाला नसता असेही घटनास्थळावरून बोलले जात होते.