सामाजिक

आषाढी यात्रेतील वारकरी भाविकांना मोफत फळे व पाणी बॉटल सेवा

फॅबटेक फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

संपादक – दिनेश खंडेलवाल 

आषाढी यात्रेतील वारकरी भाविकांना मोफत फळे व पाणी बॉटल सेवा

फॅबटेक फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर तालुका प्रतिनिधी:- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत दाखल होणाऱ्या वारकरी भाविक वैष्णवांना फॅबटेक फाउंडेशन च्या वतीने संत तनपुरे महाराज कमाणी समोर पाण्याची बॉटल व केळी चे वाटप करण्यात आले.

फॅबटेक फाउंडेशन चे भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे कर्मचारी यांनी सहभाग घेऊन, पंढरीत दाखल होणाऱ्या हजारो वारकरी भाविकांना पिण्याचे शुद्ध पाण्याचे बॉटल तसेच केळीचे वाटप केले.
यानंतर वारकऱ्यांनी केळी खाऊन टाकलेले साल तसेच पाण्याची रिकामी बॉटल उचलून परिसर स्वच्छ केला.

दरवर्षीप्रमाणे यंदाही फॅबटेक फाउंडेशनच्या वतीने वारकरी भाविकांना सेवा दिल्याने भाविकातून समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच आपले कार्य चांगले असून असेच पुढे चालू ठेवावे अशी प्रतिक्रिया यावेळी वारकऱ्यांनी दिली.

सदर कार्यक्रमासाठी एरिया मॅनेजर विनायक खसपटे, क्रेडिट मॅनेजर सुनील घोडके, ब्रांच ऑपरेशन मॅनेजर महेश पोरे,मॅनेजर निखिल होनराव,क्लार्क सुरज पाटोळे,फिल्ड ऑफिसर शंभू रोंगे,फिल्ड ऑफिसर सिद्धेश्वर शिंदे, फिल्ड ऑफिसर सुहास नागणे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close