ईतर

विठ्ठलाच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांत नेमके काय घडले, कारण काय? पहा

राष्ट्रवादी पदाधिकारी भाजप पदाधिकारी व आचार्य तुषार भोसले यांचे काय आहे म्हणणे पहा

लोकपत्र न्यूज

संपादक-दिनेश खंडेलवाल

पंढरपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांच्या समोर व श्रीविठ्ठलाच्या साक्षीने पंढरपुरात भाजपाचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने अन् हमरीतुमरीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळ व्यापाऱ्यांनाही समजले नाही की काय नेमका प्रकार घडला. दरम्यान मंदिर परिसरात बराच काळ बघ्यांची गर्दी सुद्धा झाली होती.

भाजपचे अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी च्या मंदिरात दर्शनासाठी आले. यावेळी तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँगर्सेचे कार्यकर्ते आले अशी चर्चा होऊ लागली. त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, पदाधिकारी सुभाष मस्के, माऊली हळणवर यांनी त्यांना रोखले असता भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांत जोरदार बाचाबाची सुरू झाली.

आचार्य तुषार भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या नंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आचार्य तुषार भोसले यांचा विरोध करत त्यांच्या अंगावर काळे टाकण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे…………….

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुरज पेंडाल यांनी सांगितले नववर्षानिमित्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. यावेळी भाजपचे तुषार भोसले हे आले होते. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी माहिती नसताना शरद पवारांवर टिप्पण्णी केली होती. यामुळे आम्ही तुषार भोसले यांना शरद पवारांचे ‘लोक माझे सांगाती’ हे पुस्तक भेट देण्यासाठी गेलो होतो. तेथे भाजपचे पदाधिकारी होते. त्यांनी आगाऊपणा करत घोषणाबाजी सुरू केली. आमच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी धक्काबुक्की केली. आम्हाला आंदोलन करायचे असतं तर आम्ही आणखी कार्यकर्ते घेऊन गेलो असतो पण आम्ही दर्शनासाठी गेलो होतो आणि गाडीत असलेले पुस्तक आम्ही देत होतो.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे……………….

भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी म्हटले आचार्य तुषार भोसले यांनी राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी तीव्र आंदोलने केली. या आंदोलना दरम्यान सर्व भाविक भाजपच्या मागे आले. राष्ट्रवादीच्या शहराच्या अध्यक्षांनी देशाच्या पंतप्रधानांवर टीका केली. तरी आम्ही मोठ्या मनाने याकडे दुर्लक्ष केलं. जर कुणी वाईट करत असेल तर जशास तसे उत्तर देणं हे भाजप पदाधिकारी म्हणून आमचं काम आहे.

भाजपचे अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले म्हणाले……

महाराष्ट्राचे आराध्य दैवत परब्रम्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज आम्ही सहकुटुंब पंढरपुरात आलो होतो. दर्शन घेऊन बाहेर येत असताना आमच्या असं लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते या ठिकाणी काहीतरी अनुचित प्रकार करण्याच्या तयारीत होते आणि आमचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा हा कट उधळून लावला आणि त्यांना अक्षरशः हुसकावून लावत खरतर काही महिन्यांपूर्वी झालेल्या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्रित येत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार दिला होता आणि या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः धूळ चारली होती या वैफल्यातून आजही राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर येऊ शकलेली नाही आणि महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानीमध्ये पंढरी क्षेत्रांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला त्याचा वचपा काढण्यासाठी या लोकांनी हा अनुचित प्रकार करण्याचा कट आखला होता मात्र भारतीय जनता पक्षाने त्याला यश येऊ दिले नाही. आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घरात यावं ही राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाचे गृहमंत्री असले म्हणून कायदा मोडण्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी आपली लढाई लढावी मात्र असे भ्याडहल्ले करण्याचा चुकूनही त्यांनी प्रयत्न करू नये.

बातमी व जाहिरात साठी संपर्क-                दिनेश खंडेलवाल 8788544511Gmail : lokpatranewsppur123@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close