आवताडे शुगरच्या प्रथम गाळप हंगामाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ;पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार संपन्न
शुभारंभा नंतर शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार संवाद

संपादक-दिनेश खंडेलवाल
||सस्नेह निमंत्रण||
आवताडे शुगरच्या प्रथम गाळप हंगामाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ;पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार संपन्न
शभारंभानंतर शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार संवाद
पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लिमिटेड च्या पहिल्या गळीत हंगामाचा आज दि. ४ रोजी दुपारी १२ वाजता
उसाची मोळी टाकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ
होणार असल्याची माहिती चेअरमन संजय महादेव आवताडे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आ.समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा पंढरपूर मतदार संघात आज शेतकरी मेळावा देखील घेणार आहेत. या मेळाव्या दरम्यान पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील भाजपची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी आ. आवताडे कडून प्रयत्न होणार आहे.
त्यामुळे या मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे आजी माजी खासदार आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आ. समाधान आवताडे यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा मतदार संघात होताना दिसत आहे.
प्रथम गळीत हंगामानंतर शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज
संवाद साधणार आहेत.
या वेळी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नाबाबात काय घोषणा करणार या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे.