ईतर

ह्योच सरपंच पाहिजे;देगावचे नागरिक रस्त्यावर उतरले

आत्मदानाचा झाला प्रयत्न;निर्णय मात्र गुलदस्त्यात!

संपादक-दिनेश खंडेलवाल

ह्योच सरपंच पाहिजे;देगावचे नागरिक रस्त्यावर उतरले

आत्मदानाचा झाला प्रयत्न;निर्णय मात्र गुलदस्त्यात!

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायत मधील सरपंच सौ सीमा संजय घाडगे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा देण्याच्या तयारीत असतानाच महिला, बाल, वृद्धासह नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. प्रत्येक जण रखरखत्या उन्हामध्ये “ह्योच सरपंच पाहिजे” अशा घोषना देत ग्रामपंचायत परिसर दणाणून सोडला.

आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी विविध योजना राबवत विकास साधला तर गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये अकरा कोटीचा निधी आणून गावातील रस्ते ड्रेनेज लाईट सह संध्यावळी देवीचे पर्यटन क्षेत्रात विकास करून गावांमध्ये पुन्हा एकदा पालखी सुरू केली.

गावातील लहान मुले हे देशाचे भविष्य घडविणारे असून त्यांच्या शिक्षणासाठी गावांमध्ये दररोज संध्याकाळी दोन तास मोबाईल बंद उपक्रम राज्यात पहिल्यांदा राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करून दिली. आज तेच विद्यार्थी डोळ्यात अश्रू आणत आमच्या भविष्याचा विचार करणारा तसेच आम्हाला शाळेपर्यंत येताना कोणतीही अडचण भासू न देता विकास करणाऱ्या विकासात्मक सरपंच कायम पदावर ठेवावे यासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

दरम्यान सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामपंचायत समोर ठाण मांडून बसलेले गावातील नागरिक महिला बालक व वृद्ध यांनी सरपंचांनी राजीनामा देऊ नये यासाठी आग्रह धरला याच वेळेस एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या प्रकाराने वातावरण तापले. मात्र गावातील सर्व नागरिकांनी एकोपा करत “ह्योच सरपंच पाहिजे” यासाठी ठीय्या आंदोलन सुरू केले आहे. या सर्व घटनेबाबत अद्याप पर्यंत तरी निर्णय न झाल्याने पंढरपूर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष सरपंच पदावर लागले आहे.

जनतेच्या रेठ्यापुढे सरपंच ही हतबल…..

सरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आज मी राजीनामा देणार होते परंतु देगावच्या जनतेपुढे मी हातबल झाले आहे. जनतेने माझ्यावर केलेले प्रेम आणि दिलेली साथ मी आयुष्यभर स्मरणात ठेवीन त्याचबरोबर केलेल्या विकासासाठी जनतेने घेतलेला निर्णय झाल्यावर अथवा न झाल्यावर ही मी कायम गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या गावाच्या जनतेने मला भरभरून दिलेले प्रेम पाहता माझ्या राजीनाम्याचा निर्णय जनतेला विश्वासात घेऊन देणार असल्याची ग्वाही देगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सौ.सिमा संजय घाडगे यांनी सर्वांसमोर व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close