पंढरीत गर्दीच्या ठिकाणी चोरीस गेलेले ३४ तोळे चार ग्रॅम सोने पोलिसांनी केले हस्तगत;६ आरोपी अटकेत
२४ लाख १४ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत;गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
संपादक-दिनेश खंडेलवाल
पंढरीत गर्दीच्या ठिकाणी चोरीस गेलेले ३४ तोळे चार ग्रॅम सोने पोलिसांनी केले हस्तगत;६ आरोपी अटकेत
२४ लाख १४ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत;गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी
जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांची माहिती
पंढरपूर/दिनेश खंडेलवाल:- पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात एसटी स्थानकात तसेच या ठिकाणी झालेल्या शिवमहापुराण कार्यक्रमादरम्यान आणि मठांमध्ये गर्दीच्या ठिकाणी फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १६ गुन्ह्यातील ३४ तोळे चार ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने ज्याची बाजारभावाप्रमाणे २४ लाख १४ हजार रुपये किंमत असलेला मुद्देमाल जप्त केला आहे. पंढरपूर शहर पोलिसांची तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी एसटीने प्रवास करून येणा-या महीला भावीकांची गर्दी ही नवीन एस टी स्टॅण्ड मध्ये प्रत्येक वारीस व अधुन मधुन इथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमा दरम्यान होत असते. सदर एसटी मध्ये जागा पकडण्यासाठी व एसटी मध्ये वर चढत असताना महिला भावीक प्रवासी यांचे गळ्यातील सोन्याचे मौल्यवान दागिणे चोरण्याचे प्रकार घडत होते. त्याबाबत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये विविध ठिकाणचे १६ गुन्हे दाखल करणेत आले होते. सदर चोरीच्या घटनेतील चोर हे कोणत्या गावातून किंवा परराज्यातून येतात काय ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत का? याबाबतची पोलिसांनी सखोल माहिती घेतली असता सदरचे चोर हे चोरी करून एक तर एसटी मध्ये चढुन दुसरीकडे जायचे अन्यथा एस टी मध्ये चढुन त्यांचे दुसरे सहकारी यांचेकडे सदरचे सोन्याचे दागिणे सुपुर्द करीत असल्याने एस टी स्टॅण्ड वरील शिवपुराण कार्यक्रमा दरम्यान झालेल्या गर्दीत व विरळ वस्तीचे ठिकाणी बंद घरावर पाळत ठेवुन सदर कार्यक्रमातील व घरातील सोन्याचे दागिने घेवुन पळून जात होते.
सदरची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली “गुन्हे प्रकटीकरण” शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपूर शहर व परिसरातील एसटी स्टॉप, नविन एस टी स्टॅण्ड व एस टी थांबण्याची ठिकाणे, तसेच पंढरपूर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आले होते का? या बाबत माहिती काढली असताना गोपनिय बातमीदाराकडुन एक बातमी मिळाली की सदरचे आरोपी हे पंढरपूर शहर व इतर पोलीस ठाणेकडील रेकॉर्डवरील आरोपी सखाराम उर्फ सिकंदर छगन वाघमारे रा. नाळवंडी नाका बीड,शाहरूख हमीद पठाण रा. शहनशाह नगर बीड,अर्जुन भिमराव बाबर रा. पुरग्रस्त कॉलनी बीड, रत्नाबाई बळी शेंडगे रा. इंदापुर,ताई नाना दुबळे रा. कोरफळे, ता. बार्शी, सुजाता युवराज बाबर रा. कारफळे, ता. बार्शी, नितीन धर्मा किरतकरवी रा. कोरफळे, ता. बार्शी जि. सोलापूर, शंकर विठ्ठल झेंड रा. पंढरपुर, महानंदा राम राठोड रा. कानडी पिंपळगांव ता. गेवराई जि. बीड, राजेंद्र मोहन काळे रा. कामती रोड, मोहोळ ता. मोहोळ, राणी सखाराम उर्फ सिकंदर वाघमारे रा. माळवंही नाका बिड,रतन बळी शेंडगे रा.आश्रमशाळा रोड साठेनगर, इंदापुर, ता. इंदापुर, जि. पुणे, सोण्या उर्फ सोमनाथ उर्फ लाल्या ईश्वर भोटाले रा. बेलगांव, ता. कर्जत, जि. सोलापूर असे आहेत. हे आरोपी सोन्याचे दागिणे चोरत असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचुन सदर आरोपी यांचे गावी बीड, कोरफळे, इंदापुर, सांगोला या ठिकाणी जावून त्यांचे राहणीमान व त्यांचेवर पाळत ठेवुन सदर आरोपींना दाखल गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेतले. पोलीस ठाणेस आणून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत आपण व आपले साथीदारासह एस टी स्टॅण्ड, मंदीर परीसरात तसेच गर्दी होणारे मठ व शिवपुराण कथा कार्यक्रमावेळी व बंद घरातील सोण्याचे दागिणे चोरी केल्याचे सांगितले.
आरोपी कडून गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण सखोल तपास केला असता आरोपींनी १६ गुन्हे केल्याचे सांगितले आहे. सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ,सपोफौ राजेश गोसावी, सपोफौ नागनाथ कदम,बिपीनचंद्र ढेरे,सुरज हेंबाडे,शरद कदम,सिरमा गोडसे, नितीन पलुसकर,सचिन हेंबाडे,नवनाथ माने, शहाजी मंडले,समाधान माने, बजरंग बिचुकले, निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे योगेश नरळे यांनी केली आहे.