यंदा जनता प्रस्थापितांना धडा शिकवून परिवर्तन करेल – अभिजीत पाटील
पांढरेवाडी ग्रामस्थांकडून अभिजीत पाटील यांचे बाईक रॅली काढून जोरदार स्वागत

संपादक – दिनेश खंडेलवाल
यंदा जनता प्रस्थापितांना धडा शिकवून परिवर्तन करेल – अभिजीत पाटील
पांढरेवाडी ग्रामस्थांकडून अभिजीत पाटील यांचे बाईक रॅली काढून जोरदार स्वागत
पंढरपूर(प्रतिनिधी):- २४५ माढा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये रंगत वाढत असून ठिक ठिकाणी चांगला प्रतिसाद लाभत आहे. या मतदारसंघांमध्ये प्रदीर्घकाळ सत्तेत राहूनही प्रस्थापितांना माढा मतदार संघातील नागरिकांना साध्या मूलभूत सुविधा पुरविता आल्या नाही हे दुर्दैव आहे. यंदा जनता प्रस्थापितांना धडा शिकवून परिवर्तन करेल असा विश्वास आपल्याला आहे.
आदरणीय पवार साहेबांनी माढा मतदार संघातील जनेतेच्या मनातील सल ओळखून या शेतकऱ्याच्या पोराला उमेदवारी दिली आहे. यंदाची निवडणूक आता जनतेने हाती घेतली आहे. अन्यायी प्रस्थापितांना जनता धडा शिकवत यंदा परिवर्तन घडवून आणायचं हाच जनतेचा निर्धार आहे असा विश्वास अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.
माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ माढा मतदार संघातील पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर, पांढरेवाडी, जाधववाडी, वरवडे, वाफेगाव, वाघोली, लवंग, महाळूंग या गावांना भेट दिली. यावेळी मेंढापूर ते पांढरेवाडी दरम्यान अभिजीत पाटील यांचे बाईक रॅली काढून ग्रामस्थांकडून जोरदार जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की माझ्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांना मदतीचा हात मिळाला पाहिजे हा एकच विचार घेऊन मी आपल्या समोर आलो आहे. मी सत्ता मिळावी म्हणून आपल्यासमोर उभा नाही तर परिवर्तनासाठी आपल्यासमोर आलो आहे असे आवाहन करत तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबून आपण मला भरघोस मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
विविध गावांमध्ये भेट देऊन जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जनतेनेच विजयाची खात्री दिली आहे. त्यामुळे अभिताभ पाटील यांचा विजय निश्चित असल्याचेही अनेक वक्त्यांनी सांगितले. तसेच आपले मनोगत व्यक्त करताना माढ्याचा रखडलेला विकास करण्यासाठी अभिजीत पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन प्रत्येक ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांना केले.