ब्रह्मपुरी येथे झालेल्या विकास कामांचा आढावा आ.समाधान आवताडे यांनी घेतला.
आ. समाधान आवताडे यांचे ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण, मुंडवी ,धर्मगाव येथे प्रचारानिमित्त भव्य स्वागत

संपादक – दिनेश खंडेलवाल
ब्रह्मपुरी येथे झालेल्या विकास कामांचा आढावा आ.समाधान आवताडे यांनी घेतला.
आ. समाधान आवताडे यांचे ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण, मुंडवी ,धर्मगाव येथे प्रचारानिमित्त भव्य स्वागत
पंढरपूर(प्रतिनिधी):- २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आ. समाधानदादांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांची अडीच वर्षात यशस्वी अंलबजावणी करून, पूर्ण झालेल्या व सुरु असलेल्या विकासकामांच्या माध्यमातून व प्रस्तावित कामांच्या पूर्ततेसाठी जनतेचा मतरुपी आशीर्वाद मिळवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गावभेट प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने “भाजप महायुती व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधानदादा आवताडे” यांनी ब्रह्मपुरी येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना व प्रकल्पच्या माध्यमातून ब्रह्मपुरी येथे झालेल्या विकास कामांचा आढावा यावेळी समाधानदादांनी घेतला. तसेच पुढील काळात असेच अनेक ग्रामविकासाचे, कृषी विकासाचे व महिला सबलीकरणाचे प्रकल्प अधिक गतीने पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी २० तारखेला महायुतीच्या ‘कमळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड जनाशीर्वादाने पुन्हा लोकसेवेची संधी द्यावी, असे आवाहन महायुती भाजपाचे उमेदवार समाधानदादा अवताडे यांनी केले.
सदर प्रसंगी आमदार दादाश्री यांचे सहकारी श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक युवक नेते. राजन जी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार दादाश्री यांनी सत्कार करत अभिष्टचिंतन ही केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.