पंढरपूरच्या असंख्य खवय्यांनी घेतला मतदान करुन बिलावर १० टक्के सवलतीचा लाभ
पंढरपूरच्या श्री विठ्ठल कृपा स्वीटस् बेकर्स असोसिएशनसह ४५ हॉटेल धारकांचा स्तुत्य निर्णयाला उस्फूर्त प्रतिसाद

संपादक – दिनेश खंडेलवाल
पंढरपूरच्या असंख्य खवय्यांनी घेतला मतदान करुन बिलावर १० टक्के सवलतीचा लाभ
पंढरपूरच्या श्री विठ्ठल कृपा स्वीटस् बेकर्स असोसिएशनसह ४५ हॉटेल धारकांचा स्तुत्य निर्णयाला उस्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर(प्रतिनिधी):-पंढरपूर शहर व तालुक्यातील खवय्या ग्राहकांसाठी पंढरपूरच्या ४५ हॉटेलधारकांनी मतदान करून मतदानाची निशाणी दाखवल्यानंतर त्यांच्या हॉटेलमधील पदार्थावर होणाऱ्या बिलात दहा टक्क्यांची भरघोस सूट देण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या स्तुत्य निर्णयाला खवय्या ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला तर अनेक ग्राहकांनी चांगल्या उपक्रमा साठी आभार मानले
येथील श्री विठ्ठल कृपा स्वीटस् बेकर्स हॉटेल्स असोसिएशनच्या वतीने मतदानानिमित्त खाद्यपदार्थांवर दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय पंचेचाळीस हॉटेल धारकांनी घेतल्याने खवय्यांसाठी पर्वणीच ठरली. मतदान करा आणि सवलत असलेल्या हॉटेलमध्ये उपलब्ध असलेल्या ४० विविध खाद्यपदार्थांवर दहा टक्के बिलात सवलत मिळवा अशी ही योजना पंढरपूर शहर व तालुक्यातील खवय्यांसाठी मतदानाचा टक्का वाढावा व लोकशाही बळकट व्हावी या उदात्त हेतूने प्रेरित होऊन घेतल्याचे पांडुरंग बापट यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकी साठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. मतदानासाठी सदर उपक्रमातून जनजागृती झाली, याचा लाभ असंख्य खवय्यां ग्राहकांनी घेतला. हल्ली मतदानाचा टक्का घटू लागला आहे. त्यावर विविध संस्था, संघटना आणि व्यक्तींकडून जनजागृती करण्यात येत आहे. त्या अंतर्गतच पंढरपुरातील श्री विठ्ठल कृपा स्वीटस् बेकर्स हॉटेल्स असोसिएशनने मतदान केलेल्या प्रत्येक खवय्या ग्राहकांला त्याच्या प्रत्येक बिलावर दहा टक्के सवलत देण्यात आली. हाॅटेल असोसिएशनच्या या उपक्रमाचे ४५ हॉटेलच्या ठिकाणी कौतुक झाले.
खवय्या ग्राहकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता अशा प्रकारचे विविध उपक्रम यापुढेही राबवण्याचा निर्णय आमचे असोसिएशन घेणार आहे. अशी प्रतिक्रिया पांडुरंग उर्फ आबा बापट यांनी व्यक्त केली.