शाळा, महाविद्यालयात अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा
शहीद टिपु सुलतान युवक संघटनेच्या मागणीला यश

संपादक – दिनेश खंडेलवाल
शाळा, महाविद्यालयात अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा
शहीद टिपु सुलतान युवक संघटनेच्या मागणीला यश
पंढरपूर(प्रतिनिधी):- शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्यावतीने मागील ३ वर्षांपासून सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी यांच्या कार्यालयास निवेदन देवून अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा करणेबाबत पाठपुरावा करण्यात आला त्यास यश आले असून सोलापूर जिल्हा नियोजन भवन येथे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, शिक्षणाधिकारी कादर शेख, विस्तार अधिकारी दफेदार सर यांच्यासह विविध अधिकारी व मान्यवरांसह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध संघटनाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी शहीद टिपु सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी म्हणाले की अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकासासाठी शासनाचा जीआर आहे. त्यामध्ये शिख,जैन,पारशी,मुस्लिम यासह अनेक घटक आहेत त्यांच्या विकासासाठी शाळा, स्मशानभूमी, कब्रस्थान, समाज मंदिर, ईदगाह यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी दिला जातो त्याचा लाभ घ्यावा व समाजाचा विकास करून घ्यावा. आमच्या संघटनेने अल्पसंख्यांक बहुलक्षेत्र विकास योजनेतून कब्रस्थान व इतर समाज मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून पंढरपूर शहरात काम करण्यात आले. तर संघटनेच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय ठिकाणी, शाळा, महाविद्यालयात अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा करणेबाबत शासनाच्या जीआरनुसार मागणी केली होती.
गेल्या वर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. मात्र यंदा जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय यांना अल्पसंख्यांक अधिकार दिवस साजरा करणेबाबत आदेश काढला होता त्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यासह तालुका ग्रामीण भागात शाळा, महाविद्यालयात साजरा करण्यात आलेला आहे. यामुळे संघटनेच्या मागणीला यश आले. अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, शिक्षणाधिकारी कादर शेख, विस्तार अधिकारी दफेदार सर यांचा जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.