क्राइम

पंढरीत खाजगी सावकारांच्या आवळल्या मुसक्या;चौघांवर गुन्हा दाखल

शहरातील खाजगी सावकारांच्या त्रासाबाबत संपर्क साधावा सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से)

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरीत खाजगी सावकारांच्या आवळल्या मुसक्या;चौघांवर गुन्हा दाखल

शहरातील खाजगी सावकारांच्या त्रासाबाबत संपर्क साधावा सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से)

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर शहरातील नागरिकांची उपजिविका ही येथे भरणाऱ्या चार यात्रां वर अवलंबून असल्याने या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचाच फायदा घेत शहरातील काही जणांनी खाजगी सावकारी सुरू करून मोठी माया मिळवली आहे. मुद्दल च्या दुप्पट व्याज घेणे व्याजाचा तगादा लावणे यामधून वादविवादाचे प्रसंग ही अनेक वेळा घडले आहेत. हे पंढरपूरकरांना नवे नाही परंतु पंढरपूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून प्रशांत डगळे यांनी पदभार घेतल्यानंतर प्रथमच त्यांनी चार खाजगी सावकारांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील ज्या नागरिकांना खाजगी सावकारांचा त्रास सहन करावा लागत आहे अशांनी संपर्क साधावा असे आवाहन केल्याने खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी पंढरपूर शहरातील टाकळी रोडवरील गजानन नगर येथे एस. के. हेअर सलुन हे दुकान सज्जन कलाप्पा माने रा. चळे ता. पंढरपूर हे चालवितात त्यांनी पंढरपूर शहरातील त्यांचे ओळखीचे खाजगी सावकार योगेश रमेश शिंदे रा.एल.आय.सी. ऑफिस पाठीमागे पंढरपूर, अजित रामचंद्र हजारे रा. टाकळी रोड, पंढरपूर, अमोल बाबासाहेब गांजाळे रा. गोविंदपुरा,पंढरपूर व सोन्या पवार रा. गाडगेबाबा चौक जवळ, पंढरपूर यांचेकडून व्याजाने रक्कम घेतली होती. सदरची रक्क्म व व्याज परत करून देखील बेकायदा खाजगी सावकारांनी सज्जन माने यांना व्याजाने दिलेल्या पैशासाठी तगादा लावला व सज्जन माने यांच्या मालकीची मोटारसायकल व मोबाईल हँडसेट बळजबरीने घेवून गेले आहेत अशा प्रकारचा तक्रारी अर्ज उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग यांचेकडे दाखल केला होता.

त्याअनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांचे पथका सोबत पंढरपूर पोलीस ठाणेचे पथक व सहाय्यक निबंधक कार्यालयाकडील अधिकारी यांनी संयुक्तपणे सदर बेकायदा खाजगी सावकारांच्या घरी जावून पंचनामे करून सावकारकी बाबतचे कागदपत्रे जसे की, कोरे चेक करारनामे, खरेदीखत व कोरे स्टॅम्प हस्तगत करून बेकायदा सावकारकी कायद्यांतर्गत पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सहा. पोलीस अधिक्षक यांनी पंढरपूर शहर व परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे की अशाप्रकारे कोणीही बेकायदा सावकारकी करीत असतील तर त्याबाबत आम्हास संपर्क साधावा. तसेच खाजगी सावकार यांनी कोणताही बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करून गैरकृत्य करू नये त्यांची कुठलीही गय केली जाणार नाही.

सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे (भा.पो.से), व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर यांचे पथकातील पोहवा गोविंद कामतकर,शिवशंकर हुलजंती,राहुल लोंढे तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे सपोनि आशिष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप,शहाजी मंडले, प्रसाद औटी,दिपक नवले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close