राज्य

सोलापूरात पावसामुळे बाधित भागांचा दौरा करत नागरिकांशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा संवाद

नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे दिल्या सूचना

संपादक – दिनेश खंडेलवाल

सोलापूरात पावसामुळे बाधित भागांचा दौरा करत नागरिकांशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा संवाद

नागरिकांना दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे दिल्या सूचना

पंढरपूर(प्रतिनिधी):- सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले भरून वाहू लागले होते, अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज सकाळी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांची व्यथा जाणून घेतली.या पाहणी दरम्यान सोलापूर महानगरपालिकेचे संबंधित विभागांचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बेडर पूल ,मोची गल्ली, लोधी गल्ली, शेळगी, घरकुल आणि सम्राट अशोक चौक परिसरात भेट देऊन बाधित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित नागरिकांनी संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे सांगत तातडीने मदतीची मागणी केली.

अनेक भागांमध्येही घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या भागांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. काही ठिकाणी बॅरिगेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने ८ जेसबी, १० डंपर, पाणी उपास करणारी मशीन, जटिंग मशीन यांच्या सह मोठया प्रमाणत कर्मचारी सध्या काम करत आहेत.

दरम्यान आपतकालणी यंत्रणा काम करत आहे. या शिवाय अग्निशमन विभाग हे ज्या ठिकाणी नागरिक अडकले आहेत त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. याच बरोबर ऍम्ब्युलन्स सह आरोग्य यंत्रणा देखली सर्व सज्ज करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास नागरिकांना स्थलानंतर करण्याकरीता यंत्रणा उभी करण्यात आली आहे.

नालेवरील अतिक्रमण व चुकीच्या ले-आउटमुळे पाणी अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत चौकशी करून नियमबाह्य बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. आयुक्त तसेच संबंधित अभियंते व विभाग प्रमुखांना तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याचे आदेश त्यांनी दिले.

महापालिकेच्या वतीने अग्निशामक विभाग, जेसीबी यंत्रणा, आरोग्य विभाग तसेच २४ तास आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. पाणी घरात शिरल्यास त्वरित आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही नागरिकांना केले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या की “नागरिकांना पाणी साचणे वा घरात पाणी शिरणे यामुळे होणारा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी. पावसाळ्यातील कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती टाळण्यासाठी दक्षता घ्यावी.” याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close