ईतर

पंढरीत मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

नगरपालिका शाळा क्र. ७ व ९ नव्या इमारतीसह हायटेक बनवणार - दिलीप धोत्रे

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पंढरीत मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

नगरपालिका शाळा क्र. ७ व ९ नव्या इमारतीसह हायटेक बनवणार – दिलीप धोत्रे

पंढरपूर(प्रतिनिधी):- पंढरपूर येथील प्रभाग सतरा मधील नगरपालिका शाळा क्रमांक ७ व ९ मध्ये मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. निमित्त होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य मिळताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वहात होता.
या उपक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी नगरपालिका शाळा क्रमांक ७ व ९ ही स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा असून याठिकाणी गेली ७० ते ८० वर्षो पासून ज्ञानदानाचे कार्य अखंडपणे होत आहे. बदलत्या काळामध्ये संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना लहान वयातच मिळायला हवे या हेतूने दोन्ही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संगणक देण्याचे ही जाहीर केले. शाळा क्रमांक ७ आणि शाळा क्रमांक ९ या दोन्ही शाळांच्या इमारती जुन्या आणि जीर्ण झाल्या असल्याने येणाऱ्या काळात नव्याने शाळेची इमारत उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत हायटेक शाळा करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे योगदान मोलाचे असल्याचे अधोरेखित केले. येथील शिक्षकांचे मार्गदर्शन व शिकवण्याची पद्धत चांगल्या पद्धतीची असल्याने शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतही प्रगतीपथावर आहेत अशी प्रतिक्रिया दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कायम तत्पर राहू, असा विश्वासही त्यांनी प्रभाग सतरा मधील उपस्थित नागरिक पालक यांच्या समोर व्यक्त केला.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पुस्तके, पिण्याचे बॉटल आदी साहित्यांचे वाटप करत यापुढेही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज वाटल्यास सांगा त्यांना लागणारे साहित्य दहा मिनिटात उपलब्ध करून देणार अशी ग्वाही दिली.

यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, नगरसेवक लोकेश यादव, संतोष सर्वगोड, शशिकांत पाटील, अनिल बागल, गणेश पिंपळनेरकर, श्रीमंत यादव, दिनेश पांढरे, विवेक शिंदे, कटके काका, संतोष वाघमारे, अंबादास वायदंडे, लक्ष्मण रणदिवे, पिंटू गायकवाड, आकाश बंदपट्टे, विकी विटकर, दत्ता थोरात, महेश यादव, शुभम गरड, लखन सर्वगोड, मनोज गोसावी, प्रशालेचे मुख्याध्यापक भारत क्षीरसागर, शिक्षक संतोष भांड यांच्यासह प्रभाग क्रमांक १७ मधील अनेक नागरिक, पालकवर्ग उपस्थित होते.

[ यावेळी महाराष्ट्र ब्रिलियंट सर्च परीक्षेत पंढरपूर केंद्रात शाळा क्रमांक ९ मधील विद्यार्थिनी तनुश्री सतीश वाघमारे हिने पंढरपूर विभागात आठवा क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा सन्मान दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. ]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close