ईतर

विजयादशमी (दसरा) निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

संपूर्ण मंदिरात फुलाचा सुगंध दरवळला;विठ्ठल रुक्मिणीच्या मनमोहक रूपांनी वेढले लक्ष

संपादक – दिनेश खंडेलवाल 

विजयादशमी (दसरा) निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

संपूर्ण मंदिरात फुलाचा सुगंध दरवळला;विठ्ठल रुक्मिणीच्या मनमोहक रूपांनी वेढले लक्ष

पंढरपूर :- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी (दसरा) निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचा व आकर्षक पानांचा वापर करून मनमोहक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

या सजावटीसाठी झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, ऑर्किड, अँथुरियम, कार्नेशन, सूर्यफूल, तगर, गुलछडी, लक्ष्मी कमळ, ब्लू डेझी, पिंक डेझी आदी विविध प्रकारच्या फुलांचा, तसेच जिप्सोफिला, कमिनी, अशोकाची पाने, मनीप्लांट आणि ड्रॅसिना यांसारख्या शोभिवंत पानांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगांच्या फुलांची सुबक मांडणी आणि आकर्षक रचनेमुळे ही पुष्प सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मंदिरातील गाभारा, चौखांबी व  सौळखांबी आदी ठिकाणी फुलांच्या सजावटीने संपूर्ण मंदिरात सुगंध दरवळत होता. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे मन प्रसन्न होत होते. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मनमोहक रुपांनी लक्ष वेधले जात होते.

राम जांभुळकर, पुणे यांनी ही पुष्पसजावट सेवा सेवाभावी तत्त्वावर विनामूल्य उपलब्ध करून दिली असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close