राजकिय

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सोलापुरात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

संघटनात्मक समन्वय, मतदारांशी संवाद आणि प्रचाराच्या नियोजनावर भर

संपादक – दिनेश खंडेलवाल 

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी सोलापुरात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

संघटनात्मक समन्वय, मतदारांशी संवाद आणि प्रचाराच्या नियोजनावर भर

सोलापूर:- पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपा-महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर येथील हॉटेल बालाजी सरोवर येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची संघटनात्मक रणनीती, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी पक्षाची संघटनात्मक यंत्रणा सक्रियपणे कार्यरत ठेवणे, मतदारांशी संपर्क वाढवणे आणि प्रचाराचे नियोजन प्रभावीपणे राबवणे यावर बैठकीत भर देण्यात आला.

पदवीधर आणि शिक्षक हे समाजाच्या शैक्षणिक, बौद्धिक व सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे घटक आहेत. त्यांच्या अपेक्षा, प्रश्न आणि हितसंबंध समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच पक्षाची भूमिका प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

तसेच स्थानिक पातळीवरील संघटनात्मक समन्वय, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जबाबदारी, मतदारांशी संपर्क आणि प्रचाराच्या विविध टप्प्यांचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. सर्वांनी एकजुटीने काम करून भाजपा-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.

या बैठकीस ज्येष्ठ नेते व मा. आमदार राजन मालक पाटील, आमदार सुभाषबापू देशमुख, मा.आमदार प्रशांत मालक परिचारक, आमदार समाधानदादा आवताडे, मा. आमदार दिलीपभाऊ माने, माजी आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे भाजपा सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्यासह सोलापूर संघटनात्मक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close